घरताज्या घडामोडीसलूनवाला कोव्हिड योद्धा; केस कटिंग करुन देतो सेवा

सलूनवाला कोव्हिड योद्धा; केस कटिंग करुन देतो सेवा

Subscribe

डोंगरी येथील सलूनचालक ड्युटीवरील डॉक्टर, पोलीस यांचे केस कटिंग करुन सेवा देत आहे.

कोरोना विषाणूमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखावा याकरता अत्यावश्यक सेवा वगळता काही गोष्टींवर बंदी आहे. यामध्ये मॉल्स, चित्रपट गृह, सलून हे देखील बंद आहेत. त्यामुळे एकीकडे सलून बंद असल्यामुळे अनेकांचे व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत. तर दुसरीकडे व्यवसाय बंद असल्यामुळे रडत न राहता आपणही कोरोना लढ्यात सहभाग घेण्याची एका केस कर्तनकार व्यवसायिकाने तयारी दाखवली आहे.

केस कटिंग करुन देतो सेवा

समाजातील वेगवेगळ्या पद्धतीने अनेक लोक कोरोनाशी लढा देत आहेत. डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. तर पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. दरम्यान, डॉक्टर आणि पोलिसांप्रमाणे आता एका सलून चालकाने देखील सामाजिक भान जपत आपली सेवा दिली आहे. ड्युटीवरील डॉक्टर, पोलीस यांचे केस कटिंग करुन आपल्या परीने ते कोरोना लढ्यात हातभार लावत आहेत.

- Advertisement -

डोंगरी येथील संतोष बोधारे हे व्यावसायाने केस कर्तनकार असून त्यांचे डोंगरी येथे सलून आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व सलून व्यवसाय बंद आहेत. पण, सलून बंद असले तरी आपण गप्प बसायचे, ही बाब त्यांना सतत मनातून सतावत होती. दरम्यान, कोरोनाविरोधी लढ्यात डॉक्टर, पोलीस प्रत्यक्षात काम करत आहेत. मग, त्यांना आपण मदत करायला हवी असा विचार बोधारे यांच्या मनात आला आणि त्यांनी आपल्याकडे केस कापायची कला आहे. या कलेचा वापर करुन कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर, पोलीस यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी जे. जे. रुग्णालयाचे डॉक्टर आणि डोंगरी पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे केस कापायला सुरुवात केली. विशेष म्हणजे कोणताही सेवेचा मोबदला न घेता करत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! मुंबईत हॉस्पिटलमधील तीन नवजात बालकांना कोरोना


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -