घरताज्या घडामोडीमहामारीच्या काळात देवदूत ठरलेले कोरोना योद्ध्यांचे भवितव्य अंधारात

महामारीच्या काळात देवदूत ठरलेले कोरोना योद्ध्यांचे भवितव्य अंधारात

Subscribe

कोरोना आजाराने ज्यावेळी थैमान घातले होते अशा वेळी देश सेवेसाठी पुढे आलेले कोरोना योद्धा यांना आता काम मिळेल की नाही ही चिंता सतावत असून त्यांचे भवितव्य अंधारात असल्याची चर्चा कोरोना योद्धांमध्ये केली जात आहे. कोरोना हा आजार सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने भीतीचे वातावरण असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तरुणांना आवाहन केले की, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन लोकांच्या सेवेसाठी रूग्णालयात काम करावे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर अनेक तरुण आपल्या जिवाची पर्वा न करता आणि कुटुंबियांचा विचार न करता कोरोना योद्धा म्हणून पालिका रुग्णालयात सेवेसाठी सज्ज झाले आणि आजही ते काम करीत आहेत. पालिकेचे परमनंट कामगार कोरोना पेशंटकडे जाण्यासाठी भीत होते अशावेळी स्वतःहून पुढे येऊन या कोरोना योद्धा म्हणून काम करीत असलेल्या तरुणांनी आपली भूमिका निभावली.

कंत्राटी पद्धतीने मिळालेले काम आज आहे की नाही की उद्या जाईल अशी भीती या तरुणांना सतावत आहे. दरम्यान आता बरेचशे कोरोना सेंटर बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता आपल्या हाताला काम मिळेल की नाही की कंत्राटदार आपल्याला कामावरून काढून टाकेल यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तर या संदर्भात पालिका आयुक्त इकबाल चहल, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि मुंबईच्या महापौर किशोरी ताई पेडणेकर या लक्ष देतील का?, या आशेवर हे तरुण आहेत. आम्हाला पालिका सेवेत कायमस्वरूपी काम मिळावे अशी मागणी या कोरोना योद्धा यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लहान मुलांना कोरोना लस नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -