Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ४६१ नव्या रुग्णांची नोंद, ३ जणांचा...

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ४६१ नव्या रुग्णांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

मुंबई गेल्या २४ तासांत ४६१ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १५ हजार ३०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात मुंबईत ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत २ लाख ९७ हजार १०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार ६४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


- Advertisement -

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.


- Advertisement -

टॉप्स सिक्युरिटी घोटाळा प्रकरण; ईडीकडून आर.ए.राजीव यांची ९ तास कसून चौकशी

टॉप्स सिक्युरिटी घोटाळा प्रकरणी ईडीकडून आर.ए.राजीव यांची ९ तास कसून चौकशी करण्यात आली. आता आर.ए.राजीव ईडी कार्यालयाबाहेर आले आहेत. एमएमआरडीएकडून क्लीन चीट दिली गेली नाही आहे. आर.ए. राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, काम कसं चालतं, विविध टेंडरिंग कसं होतं, निर्णय कोण घेते यासंदर्भात चौकशी करण्यात आली.


टूलकिट प्रकरणी शंतनू मुळूकला अटकेपासून दिलासा

टूलकिट प्रकरणी शंतनू मुळूकला १० दिवसांची ट्रांजिट बेल मिळाली आहे. औरंगाबाद खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मात्र निकीता जेकबाबतचा निर्णय उद्या घेण्यात येणार आहे. सविस्तर वाचा 


अन्यथा मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होईल – महापौर

कोरोनाच्या आकडेवारीत घट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांकरता १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे. तर लोकल सुरु होऊन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र, आता चिंतेचीबाब समोर आली आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pedanekar) यांनी दिला आहे.


 विक्रमगडमध्ये ‘मेगा ऑक्सिजन टॅंक’ घोटाळा – किरीट सोमय्या
मुख्यमंत्र्यांच्या पालघर दौऱ्याला काही दिवस उलटतात तोच किरीट सोमय्याही आज मंगळवारी विक्रमगड, पालघर दौरा केला. विक्रमगड आणि पालघरमध्ये मेगा ऑक्सिजन टॅंक घोटाळा झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनेक रूग्णांचे सदोष ऑक्सिजन पुरवठ्याच्या सिस्टिममुळे मृत्यू झाल्याचे किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारमार्फत काही महिन्यांपूर्वी ऑक्सिजन सिस्सिट बसविण्यात आली. पण ही सिस्टिम सुरू झाली नसल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोरोना काळातला हा एकप्रकारचा घोटाळा असल्याचे किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाहसोहळा संपन्न
आजपर्यंत तुम्ही अनेक विवाह सोहळे पाहिले असतील मात्र तुम्ही देवाचा विवाह पाहिलाय का.. असाच एक विवाह सोहळा पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला.

नायर रुग्णालयात २६ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये एका २६ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नायर हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ विभागातील (anaesthesia department) २६ वर्षीय डॉक्टरने सोमवारी रात्री आत्महत्या केली असून या मृत डॉक्टरचे नाव डॉ. संदेश तुपे आहे. डॉक्टरांचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला आणि त्याला पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला आहे, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


भाजप आमदाराला राष्ट्रवादीत प्रवेशाची खुली ऑफर

सातारा जिल्ह्यात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची खुल्लमखुल्ला ऑफर दिली आहे. एकेकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये राजकारण पेटलं होते. परंतु राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा असे म्हटले आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी नगरपालिका निवडणुकींपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व करतील रामराजे यांच्या माध्यमातून एकत्र येऊन बिनविरोध निवडणूक करु असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.


६ लाख कोंबड्यांची कत्तल

राज्यात मागील महिन्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर अनेक पक्षी, पानथळ पक्षी, कावळे, बगळे, कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या मृत पक्ष्यांच्या नमुन्यांचे परिक्षण केल्यावर त्यांचा अहवाल बर्ड फ्लू सकारात्मक आला. बर्ड फ्लूच्या संसर्गाने कोंबड्या दगावत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यावर अनेक जिल्ह्यांतील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची कत्तल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. उत्तर महाराष्ट्रात लातूर, नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांना मारण्यात आले होते. नंदुरबारमधील नवापूरमध्ये बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात मोठं कलिंग ऑपरेशन सुरु केले होते. हे कलिंग ऑपरेशन मागील पाच दिवसांपासून सुरु होते.


अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येने नेटकरी आक्रमक, केली न्यायची मागणी

हिंदी सिनेसृष्टीत २०२० अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण बरेच चर्चेचा विषय ठरले आहे. तर सुशांत सिंह सोबत ‘एमएस धोनी’ या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अभिनेता संदीप नाहर संशयास्पद मृत्यू झाला आहे. परंतु प्राथमिक माहितीनुसार संदीपने आत्महत्या केले असल्याचे समजते आहे.


विदर्भातील शिवसेनेचे बडे नेते संजय राठोड हे येत्या गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याकडे राजीनामा मागितला जात आहे.


मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ( Mumbai-Pune Expressway) कंटेनरचा भीषण अपघात (contener bus crash) झाला आहे. अपघातात पाच जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. खालापूर मुंबई लेनवर हा अपघात झाला असून अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कंटेनरची चार वाहनांना धडक लागून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.


मुंबईकरांनो पुढील ७ दिवस महत्त्वाचे -मुंबई पालिकेचा इशारा

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सावध झाल्या आहेत. डिसेंबर नंतर प्रथमच एकाच दिवसात चार हजार कोरोनाबाधित आढळले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर मुंबई महापलिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनीही मुंबईकरांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून पुढील ७ दिवस महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -