घरताज्या घडामोडीदहा रूपयात एअरपोर्टसारखा आराम...

दहा रूपयात एअरपोर्टसारखा आराम…

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येथे अत्याधुनिक प्रतीक्षालय नुकतेच सुरू असून आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येथे अत्याधुनिक प्रतीक्षालय नुकतेच सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या कमी असली तरी वातानुकूलित प्रतीक्षालय प्रवाशांच्या चांगलेच पसंतीला उतरले आहे. केवळ १० रुपयात तासभर गारेगार आराम करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती नमह प्रतीक्षालयचे व्यवस्थापक रामभोर पांडे यांनी दै.आपलं महानगरला दिली आहे.

अत्याधुनिक प्रतीक्षालयाल सुसाट

मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी अनेक प्रयोग करत आहेत. त्यांच्या एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अत्याधुनिक प्रतीक्षालय सुरू केले आहे. नमह हे प्रतीक्षालय सीएसएमटी रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५, १६, १७ आणि १८ यांना जोडणार्‍या कॉरिडोर जवळ सुरू केले आहे. या प्रतीक्षालयातील सुविधांचा वापर नागरिकांना केवळ १० रुपये प्रति तास या शुल्कात करता येणार आहे. या प्रतीक्षालयात प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. १९ ऑक्टोबर २०२० ला या प्रतीक्षालयाची सुरुवात झाली होती. अवघ्या काही दिवसात कोरोनातही उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त प्रवाशांनी या आधुनिक प्रतीक्षालयाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद बघता मध्य रेल्वेच्या दादर, लोकमान्य टिळक टर्मिनससारख्या रेल्वे स्थानकात अशा प्रकारची प्रतीक्षालये सुरू करण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे.

- Advertisement -

या आहेत सुविधा

या आधुनिक प्रतीक्षालयात आरामदायी सोफा, डायनिंग टेबल्स, आधुनिक बाथरुम विथ बाथ कीट, वाचनालय, मोबाईल चार्जिंग पॉईट, लॅपटॉप सिटिंग अरेंजमेंट, कॅफे सर्व्हिस, बुफे सर्व्हिस, ट्रॅव्हल कीट, वायफाय, रेल्वे गाड्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी उद्धोषणा यंत्रणा, एलईडी स्क्रीनवर आगमन-प्रस्थान करणार्‍या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अशा सुविधा या प्रतीक्षालयात प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

असे आहेत दर

१२ वर्षांवरील व्यक्तींसाठी १० रुपये प्रतितास, ५ ते १२ वर्षांसाठी ५ रुपये प्रतितास असे शुल्क आकारण्यात येत आहे. पाच वर्षांखालील मुलांना प्रतीक्षालयात मोफत प्रवेश आहे. सध्या काही दिवस प्रवाशांकडून यासाठी अनामत रक्कम म्हणून ५० रुपये घेण्यात येतात. जाताना ती रक्कम प्रवाशांना परत करण्यात येते.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -