क्रिकेटपटू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर पोलिसांनी घेतलं ताब्यात

कृणालच्या या बातमीमुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

cricketer krunal pandya arrested in mumbai airport by dri
क्रिकेटपटू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर पोलिसांनी घेतलं ताब्यात

आयपीएल संपवून भारतीय क्रिकेटपट्टू मायदेशी परतत आहेत. भारतीय क्रिकेटपट्टू कृणाल पांड्यला याला गुरूवारी मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. नियमापेक्षा जास्त सोने जवळ बाळगल्याने कृणाल पांड्यावर महसूल गुप्तचर संचालनाकडून( DRI ) कारवाई करण्यात आली आहे. या बाबात कृणालची मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. कृणालच्या या बातमीमुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आयपीएल संपवून क्रिकेटर कृणाल पांड्या हा दूबईहून भारतात परत आला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. हवाई वाहतूक नियमावलीनुसार कृणालकडे प्रमाणापेक्षा जास्त सोने समोर आले. मुंबई विमानतळावर ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सोने आणल्यामुळे कृणाल पांड्यावर कारवाई करण्यात आली. कृणालकडे सोन्याचे दागिने, बांगड्या व इतर मौल्यवान वस्तू सापडल्या. त्याचप्रमाणे हातातील महागडी घड्याळेही आढळून आली.

आयपीएल २०२०च्या सिझनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मुंबई इंडियन टिमचे कौतुक करण्यात आले. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आपली बाजी मारली.  मुंबई संघाचा ऑल राउंडर कायरन पोलार्ड याने मुंबईच्या संघातील खेळाडू कृणाल पांड्या आणि हार्दीक पांड्या या दोघांच्या उत्तम कामगिरीवर भाष्य केले होते. कृणाल पांड्या हा २०१६ मध्ये आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाला. आत्तापर्यत कृणालने ५५ सामने खेळले आहेत.


हेही वाचा – महापालिकेचा स्तुत्य उपक्रम: नवरात्रौत्सवातील घटांचा वापर झाडांसाठी