घरमुंबईबॉम्बचा बोगस कॉल करणार्‍या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

बॉम्बचा बोगस कॉल करणार्‍या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

पत्नीला कॉल करुन मानसिक त्रास देणार्‍या व्यक्तीविरुद्ध स्थानिक पोलिसांकडून काहीच कारवाई केली जात नसल्याच्या रागातून बॉम्ब बोगस कॉल करणार्‍या एका व्यावसायिकाला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यातील व्यापारी हा कांदिवली परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. त्यांचा मेडीकल साहित्य पुरविण्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपासून त्यांच्या पत्नीला अज्ञात व्यक्तीकडून कॉल येत होते. या व्यक्तीकडून सतत कॉल करुन त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे या व्यापार्‍याने स्थानिक पोलीस ठाण्यात कॉल करणार्‍या व्यक्तीविरुद्ध तक्रार करुन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र त्याची पोलिसांकडून योग्य ती दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे या व्यापार्‍याला पोलिसांविषयी प्रचंड चीड होती. त्यातून त्याने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करुन बॉम्बस्फोट होणार आहे असा कॉल त्याला आल्याचे पोलिसांना सांगितले.

- Advertisement -

या कॉलनंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या व्यापार्‍याची पोलिसांकडून कसून चौकशी केली, चौकशीत त्याला असा कुठलाही कॉल नसल्याचे उघडकीस आले. अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या पत्नीला मानसिक त्रास दिला जात होता, त्याच्याविरुद्ध पोलिसांकडून काहीच कारवाई होत नसल्याने त्याने संबंधित कॉलर आणि स्थानिक पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी बोगस कॉल करुन पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -