घरमुंबईमुंबईत आणखी एका मशिदीवर गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

मुंबईत आणखी एका मशिदीवर गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ४ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मुंबईतील ११४० मशिदींपैकी बहुतांश मशिदींनी लाऊड स्पीकरशिवाय अजान केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका मशिदीवर कारवाई केली आहे. याप्रकरणी विक्रोळी परिसरातील मशिदीवर पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई केलेली ही तिसरी मशीद आहे. यापूर्वी दोन मशिदींवर वांद्रे आणि सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ४ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मुंबईतील ११४० मशिदींपैकी बहुतांश मशिदींनी लाऊड स्पीकरशिवाय अजान केली होती. तर १३५ मशिदींनी पहाटे ५ वाजता अजाण लाऊड स्पीकरवरुन वाजवली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन लाऊड स्पीकरचा वापर करणाऱ्या मशिदींविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली. पोलिसांनी वांद्रे येथील नूरानी मशीद आणि सांताक्रूझ येथील कब्रस्तान मशिदीविरोधात गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर मुंबई पोलिसांनी धार्मिक स्थळांना सर्वोच्च न्यायालयाचं पालन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर बंद ठेवण्याचे आदेश दिले. तर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकर वापरण्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई पोलिसांनी मशिदींसोबत चर्चाही केली होती. त्यानंतर दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या प्रमुखांनी बैठक घेत पहाटेची अजाण भोंग्याविना करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -