Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई Raj kundra Case: राज कुंद्राच्या कार्यालयात गुन्हे शाखेचा पुन्हा छापा; सापडलं छुपं...

Raj kundra Case: राज कुंद्राच्या कार्यालयात गुन्हे शाखेचा पुन्हा छापा; सापडलं छुपं कपाट!

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला तपासादरम्यान खूप महत्वाचे पुरावे सापडले आहेत. अंधेरीतील राज कुंद्रा यांच्या वियान आणि जेएल स्ट्रीम कार्यालयात एक ‘इंटेलिजेंस कपाट’ सापडल्याचे मुंबई पोलिसांनी शनिवारी सांगितले. पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण पुरावे या कपाटातून समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने शुक्रवारी कोर्टाला असे सांगितले की, राज कुंद्रा लवकरच १२१ अश्लील व्हिडिओंचा ९ कोटी रुपयांवर व्यवहार करणार आहे. त्यांच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील संभाषणांमधून आणि इतर ईमेलने अश्लील चित्रपटाशी संबंधित या व्यवसायाला या लोकांनी ‘प्रोजेक्ट ख्वाब’ असे नाव दिले होते.

- Advertisement -

तसेच, पोनोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने तीन लोकांना समन्स बजावला आहे. मॉडल आणि टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ट आणि अन्य दोघांना समन्स बजावत चौकशी साठी बोलावले आहे. पोर्नोग्राफी प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी गहनाला अटक करण्यात आले होते, आता तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. क्राईम ब्रांच दुसऱ्यांदा त्या सर्व आरोपींची चौकशी करणार असून जे आरोपी या प्रकरणात आधी अटक झाले होते आणि सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

अटक झालेल्या उद्योगपती राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान, जबाब देताना शिल्पा शेट्टी तीन ते चार वेळा रडू लागली. अडीच तास गुन्हे शाखेने तिची चौकशी केली. सध्या राज कुंद्रा २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहे आणि शुक्रवारी ६ तास गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने चौकशीदरम्यान सांगितले की तिने गेल्या वर्षी ‘वियान’ कंपनी सोडली होती. पोलिसांना दिलेल्या निवेदनात अभिनेत्रीने म्हटले आहे की, ‘हॉटशॉट’ अ‍ॅप काय आहे आणि ते कसे कार्य करते हे मला माहिती नाही. तिला फक्त एवढेच माहिती होते की तिच्या पतीची कंपनी वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म करते.


वरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू, ३ जखमी

- Advertisement -