घरक्राइमCrime in Mumbai : दागिन्यांसाठीच्या तीस लाखांचा अपहार; अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा

Crime in Mumbai : दागिन्यांसाठीच्या तीस लाखांचा अपहार; अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा

Subscribe

दागिन्यांच्या पेमेंटचा अपहार केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या अधिकार्‍याविरुद्ध साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : दागिन्यांच्या पेमेंटचा अपहार केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या अधिकार्‍याविरुद्ध साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशाल भारतीय असे या अधिकार्‍याचे नाव असून त्याच्यावर तीस लाखांचा अपहार करत कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातील तक्रारदार अंधेरीतील एका खासगी कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. (crime in Mumbai cheating the company by embezzling thirty lakhs)

तक्रारदार ज्या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम करतात, ती कंपनी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरात सोन्या – चांदीच्या दागिन्यांची विक्री करते. याच कंपनीत विशाल गेल्या सात वर्षांपासून कामाला होता. त्याच्याकडे बिझनेस डेव्हल्पमेंट, प्रोडेक्ट मार्केटिंग आणि सेलची जबाबदारी होती. त्याच्या कामावर प्रभावित होऊन वर्षभराने कंपनीने त्याच्यावर हैद्राबाद, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील काही शहरांच्या झोनची जबाबदारी सोपविली होती. डिसेंबर २०२३ पर्यंत विशालने अत्यंत प्रामणिकपणे काम केले. त्याने विक्री केलेल्या सर्व दागिन्यांचे पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा झाले होते. (crime in Mumbai cheating the company by embezzling thirty lakhs)

- Advertisement -

हेही वाचा – Suicide : आत्महत्येप्रकरणी बारा जणांवर गुन्हा; विष पिऊन शेअर ट्रेडरची आत्महत्या

जानेवारी २०२४ पासून त्याच्याकडून पेमेंट जमा होण्यास विलंब होऊ लागला. याबाबत विचारणा करुनही तो उत्तर द्यायला टाळाटाळ करत होता. चौकशीदरम्यान जानेवारी ते एप्रिल महिन्यांत त्याने हैद्राबादच्या विविध व्यापार्‍यांना सुमारे ३० लाखांचे दागिने विकल्याचे समोर आले. मात्र या दागिन्यांचे पेमेंट विशालने कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीने त्याला विचारणा केली. तरीही तो गप्पच बसला. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने साकीनाका पोलिसात तक्रार करण्यात आली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी विशालविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (crime in Mumbai cheating the company by embezzling thirty lakhs)

- Advertisement -

Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -