मुंबई : तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, अशा घटनांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मालाडमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपी प्रियकराने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचाक केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत या तरुणीचा दोनदा गर्भपात झाल्याची माहिती देखील उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रियकर हा फरार झाला असून त्याचा मालाड पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. नसीर नहीम शाह (वय वर्ष 27) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. (Crime news Cheating of young woman by pretending to marry, Malad police are searching accused boyfriend)
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड येथे राहणार्या एका तरुणीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या प्रियकरावर मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करून आरोपी नसीर नहीम शाह याने पीडित तरुणीची फसवणूक केली. इतकेच नव्हे कतर आरोपीने तिचा दोनदा जबदस्तीने गर्भपात केला होता. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. 28 वर्षांची पिडीत तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात राहते. दोन वर्षांपूर्वी तिची नसीरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर मैत्री आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अंधेरीतील एका हॉटेलमध्ये अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तसेच, आरोपीने पीडित तरुणीशी लग्न न करता तिच्या मनाविरुद्ध गर्भपात केला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो लग्नाचा विषय निघाल्यानंतर तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने त्याच्याविरुद्ध मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नसीर शाहविरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी नसीर हा पळून गेल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. ज्यामुळे पोलिसांकडून हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यात येत असून पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे.