Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई मुंबईकरांनो सावधान! हत्या, बलात्कार, घरफोडीच्या घटनांमध्ये झाली वाढ

मुंबईकरांनो सावधान! हत्या, बलात्कार, घरफोडीच्या घटनांमध्ये झाली वाढ

Related Story

- Advertisement -

देशाची आर्थिक राजधानी असेलल्या मुंबई शहरात कोरोना साथीच्या आजाराबरोबरच गुन्हेगारीच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होतेयं. मार्च २०२० च्या तुलनेत २०२१ या चालू वर्षातील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मुंबईत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपींमुळे मुंबईतील गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे. यातच सचिन वाझे प्रकरणही गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणादरम्यान बदल्यांमुळे गुन्हेगारांवरील पकड झाली सैल 

मार्च २०२० मध्ये जाहीर झालेल्या लॉकडाऊनदरम्यान मुंबईतील गुन्हेगारी नियंत्रणात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव तुरुंगातील कैद्यांपर्यंत पोहचल्याने अनेक कैद्यांना जामिनावर बाहेर सोडण्यात आले. राज्यातील सुमारे १२ हजारहून अधिक कैदी यामुळे बाहेर आले. परंतु पोलीस दलातील वाढता संसर्ग, नियमभंगांचे वाढते प्रमाण आणि लॉकडाऊन शिथिलतेनंतर मुंबईत गुन्हेगारी वाढू लागली. यातच अंबानी अँटिलिया स्फोटक प्रकरण, सचिन वाझे, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाने संपूर्ण पोलीस खाते ठवळून निघाले. या सर्व प्रकरणांमुळे पोलीस कारवाया थंडावल्याने दुसरीकडे मुंबईत गुन्हेगारीला पेव फुटले.

- Advertisement -

२०२०ची जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांची आकडेवारी पाहिल्यास चालू वर्षाच्या चार महिन्यांत हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी असे सर्वच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२० प्रमाणेच २०२१ च्या सुरुवातीला मुंबईत निर्बंध होते. मात्र वाझे प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बदल्या झाल्या. यात अनेक पोलिसांचे मनोबल खचले आणि तुरुंगाबाहेर असलेल्या कैद्यांनाही मोकळे रान मिळाले त्यामुळे गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे काही अधिकारी सांगतात.

मुंबईतील वाढत्या गुन्हेगारी आकडा पाहिल्यास मुंबईत जानेवारी ते एप्रिलदरम्यान एकून २०२१२०२० विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील ५०४७ हत्या, १२८१०४ हत्येचा प्रयत्न, ७४ दरोडा, २४६ २३७ जबरी चोरी , ९९ ८० खंडणी, ५३७ ५१० घरफोडी, १०९८ ७२५ वाहनचोरी, ३१२ २५६ बलात्कार , १४५५ १२१४ मारहाण अशी विविध गुन्हांची नोंद झाली आहे.

२०२१ मधील जानेवारी , फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिनानिहाय गुन्हेगारीची आकडेवारी

- Advertisement -

घरफोडी – १७६ जाने, १५३ फेब्रु, ११५ मार्च, ९५ एप्रिल

वाहनचोरी – ३२५ जाने, २४८ फेब्रु, ३२९ मार्च, १ ९८ एप्रिल

बलात्कार – ७५ जाने, ७३ फेब्रु, ७० मार्च, ६६ एप्रिल

दरोडा – ०१ जाने, ०२ फेब्रु, ०२ मार्च, ०१ एप्रिल

जबरी चोरी – ८९ जाने, ७५ फेब्रु, ८० मार्च, ४७ एप्रिल

मारहाण- ३४१ जाने, २८७फेब्रु, ४३५ मार्च, ३२१ एप्रिल

हत्या – १२ जाने, १५ फेब्रु, १५ मार्च, ०७ एप्रिल

हत्येचा प्रयत्न – ३६ जाने, ३१ फेब्रु, १४ मार्च, २७ एप्रिल

खंडणी – ३१ जाने, २५ फेब्रु, २५ मार्च, १२ एप्रिल


वर्दीचा दाखवत चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याने चार पोलिस अधिकाऱ्यांनी गमवली नोकरी

- Advertisement -