घरमुंबईपोलिसांवर हल्ला करणार्‍या राणाचा एनकाऊन्टर

पोलिसांवर हल्ला करणार्‍या राणाचा एनकाऊन्टर

Subscribe

पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या हिस्ट्रीशिटर गुन्हेगाराचा नालासोपारात सोमवारी दुपारी एन्काऊंटर करण्यात आला. मात्र, त्यात दोन पोलीसही जखमी झाले आहेत.

पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या हिस्ट्रीशिटर गुन्हेगाराचा नालासोपारात सोमवारी दुपारी एन्काऊंटर करण्यात आला. मात्र, त्यात दोन पोलीसही जखमी झाले आहेत. भर रस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे राधानगर परिसर हादरून केला. ज्या ठिकाणी हा एन्काऊंटर झाला त्या ठिकाणी वीज ट्रान्सफार्मर आहे. त्यात अनेकदा पावसात आणि इतर कारणांनी वीजतारांचे स्फोट होऊन आवाज होत असतात. गोळीबाराच्या आवाजालाही स्थानिकांनी वीजतारांचे स्फोटच समजल्याने नागरिकांना या एन्काऊंटरी माहिती घटनेनंतर उशिराने समजली.

पालघर पोलिसांना अनेक प्रकरणात हवा असलेला गोविंद राणा हा हिस्ट्रीशिटर गुन्हेगार नालासोपार्‍यात एकाची हत्या करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे हवालदार मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ यांना मिळाली होती. त्यामुळे या दोघांनी तुळींज राधानगर परिसरात दुपारपासून पाळत ठेवली होती. त्यावेळी विष्णू दर्शन इमारती समोरून राणा आणि त्याचे अन्य दोन साथीदार जात असलेले त्यांना दिसले. चव्हाण आणि सकपाळ यांनी राणावर झडप घातली असता राणाने आपल्या जवळील चाकुने त्यांच्यावर हल्ला केला.

- Advertisement -

त्याचवेळी राणाच्या एका साथीदारानेही चॉपरने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश चव्हाण आणि सकपाळही जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि जांघेत दुखापत झाली. त्यावेळी स्वरक्षणासाठी चव्हाण यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात राणा जागीच ठार झाला. त्यावेळी त्याचे साथीदार पळून गेले. जखमी चव्हाण आणि सकपाळ यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -