घरमुंबईमीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांचा राडा

मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांचा राडा

Subscribe

मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये मोठा राडा झाला आहे. मंगळवारी महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाचा संदर्भातील विषयाचा समावेश न केल्यामुळे शिवसेना नगरसेवकांना आपला राग अनावर झाला. त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन स्थायी समिती सभागृहातील खुर्च्यांची आणि इतर वस्तूंची तोडफोड केली. यावेळी त्यांची भाजपच्या नगरसेवकांसोबत बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनाच्या नगरसेवकांनी भाजपच्या स्थानिक आमदारांवर टीका कत त्यांना शिवीगाळ केली.

काय आहे नेमके प्रकरण?

मीरा-भाईंदर महापालिकेच्या मंगळवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार होती. दरम्यान, या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि प्रमोद महाजन सभागृह या विषयांवर चर्चा करण्यात येईल, अशी आशा वर्तवण्यात येत होती. मात्र, बैठकीतील चर्चेत या विषयाचा समावेश न केल्यामुळे शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले. दालन उभारण्यात स्थानिक आणदार नरेंद्र मेहता अडथळा आनत आहेत, असा आरोप नगरसेवकांनी केला. शिवसेना नगरसेवकांनी स्थायी सभागृहातील खुर्चा तोडल्या आणि स्थानिक आमदारालाही अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -