घरताज्या घडामोडीCruise drug bust: मनीष भानुशालीचे गुजरात ड्रग्ज कनेक्शन काय?

Cruise drug bust: मनीष भानुशालीचे गुजरात ड्रग्ज कनेक्शन काय?

Subscribe

शनिवारी रात्री एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकली. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आणि बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खानसह आतापर्यंत १६ जणांचा या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याच संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलं नसल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आणि या कारवाईत असलेल्या एका व्यक्ती म्हणजे मनीष भानुशालीचे भाजप कनेक्शन असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी मनीष भानुशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांसोबतचे फोटो माध्यमांना दाखवले. तसेच या मनीष भानुशालीचे गुजरात ड्रग्ज कनेक्शन देखील नवाब मलिक यांनी सांगितले.

भानुशालीचे गुजरात ड्रग्ज कनेक्शन, वाचा

३ ऑक्टोबरला झालेल्या कारवाईत दोन व्यक्ती एनसीबीचे नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. एका व्यक्तीचे नाव के.पी. गोसावी आणि दुसऱ्या व्यक्तीचे नाव मनीष भानुशाली होते. यामधील मनीष भानुशालीचे गुजरात ड्रग्ज कनेक्शन काय आहे असा त्यांनी सवाल केला.

- Advertisement -

नवाब मलिक म्हणाले की, ‘२१ तारखेला मनीष भानुशाली काही मंत्र्यांचा घरी दिल्ली होता. त्यानंतर २२ तारखेला गांधी नगरमध्ये राहिला. २८ तारखेला गांधी नगरच्या मंत्रालयात त्याच्या बैठकी सुरू होत्या. २१-२२ तारखेला गुजरातच्या मुंद्रा पोर्टमध्ये ३ हजार कोटी की २७ हजार कोटी हे मला माहित नाही. पण अफगाणिस्तानहून येणारे ड्रग्जचे कंसाईन पकडले गेले. यावेळेस मनीष भानुशाली दिल्ली कोणाला भेटत होता, गुजरातमधील कोणत्या मंत्र्यांसोबत त्याची बैठक होती. २८ तारखेपर्यंत गुजरातच्या मंत्रालयमध्ये भानुशाली काय करत होता. २८ तारखेला तो पुन्हा मुंबईत परतला. १ तारखेला गुजरातच्या मंत्रालयात जाऊन त्याने राणा नावाच्या मंत्र्यासोबत बैठक केली. त्यानंतर ३ तारखेला तो पुन्हा धाड टाकतो.’

‘या सर्व प्रश्नांची उत्तर एनसीबीला द्यावी लागेल. पूर्ण एनसीबीचा वापर भारतीय जनता पार्टी लोकांना बदनाम करण्यासाठी करत आहे. गुजरात ड्रग्ज कनेक्शनसोबत भानुशालीचे काय कनेक्शन असेल हे एनसीबी सांगावे. भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुशाली आहे का? मनीष भानुशालीकडे कोणती जबाबदारी दिली आहे? याबाबतचा खुलासा करावा लागेल. एनसीबीचे भानुशालीचे काय कनेक्शन? भाजप आणि भानुशालीचे काय? अशा सर्व प्रश्नांची उत्तर एनसीबी आणि भाजपने द्यावी,’ अशी मागणी मलिक यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Cruise drug bust : क्रूझ कारवाईतील मनीष भानूशालीचे भाजप कनेक्शन, मोदी, शाह, फडणवीसांसोबत फोटो


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -