Cruise drug bust : कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी NCB चा छापा

आर्यननंतर इम्तियाज खत्री एनसीबीच्या रडावर

cruise drug bust NCB raids producer Imtiaz Khatri's house
cruise drug bust : निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी NCB चा छापा, कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी अटक

कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीत (Cordelia Cruise party) एनसीबीने  (NCB) केलेल्या छापेमारीनंतर एनसीबीच्या कारवाईला चांगलाच वेग आला आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी एनीसीबीकडून छापेमारी करण्यात आली आहे. आज मुंबईतील वांद्रे भागात एनसीबी अधिकाऱ्यांनी चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री ( Imtiaz Khatri) याच्या घरी छापेमारी केली. तर एका ड्रग्ज पेडलरला देखील ताब्यात घेतले आहे. आर्यननंतर इम्तियाज खत्री एनसीबीच्या रडावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया क्रूझ पार्टीत अटक करण्यात आलेल्या अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव समोर आले आणि त्यानंतर एनसीबीने त्याच्या घरी छापेमारी केली आहे. एनसीबीची टीम आज पहाटेच निर्माता इम्तियाजच्या घरी पोहचली. इम्तियाजच्या राहत्या घरी छापेमारी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावेळी देखील इम्तियाज खत्रीचे नाव पुढे आले होते. त्यावेळी इम्तियाज आणि सुशांत सिंहचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या तपासादरम्यान इम्तियाज गायब झाला होता.

कोण आहे इम्तियाज खत्री?

इम्तियाज खत्री हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव असून तो चित्रपट निर्माता आहे. इम्तियाजने हिंदी तसेच मराठी सिनेमांची देखील निर्मिती केली आहे. ह्रदयांतर या मराठी सिनेमाची निर्मिती इम्तियाजने केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर इम्तिजायचे नाव सर्वात पुढे आले होते. चौकशीदरम्यान तो अचानक गायब झाल्याने त्याच्यावरचा संशय आणखी वाढला होता.

वांद्रे बनले ड्रग्ज हब

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील वांद्रे,अंधेरी भागातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात येत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार, निर्माते याच भागात राहतात. त्यामुळे वांद्रे हे ड्रग्ज हब असल्याचे म्हटले जात होते. कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणानंतर एनसीबीने पुन्हा एकदा वांद्रे परिसरातील अनेक ठिकाणी छापेमारी करण्याचे सत्र सुरू केले आहे.


हेही वाचा – Aryan Khan bail plea rejected: जेलमध्ये आर्यन खानचा सकाळी ६ वाजता सुरू होणार दिवस, ७ वाजता नाश्ता…