Aryan Khan Drug Case: आर्यन खान अनेक वर्षांपासून घेतोय ड्रग्ज – NCB

Cruise Drug Case aryan khan takes drugs from many year said ncb

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आजही दिलासा मिळाला नाही. आजही आर्यन खानच्या जामिनावर निर्णय झाला नसून २० ऑक्टोबरला आर्यनच्या जामिनावर निर्णय होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. एनसीबीने आज देखील आर्यन खानला जामीन कसा मिळणार नाही यावरच जोर दिला. एनसीबी आर्यनच्या जामिनाला विरोध करत होती. आजच्या सुनावणी दरम्यान एनसीबीची बाजू अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह म्हणाले की, आर्यन खानने पहिल्यांदाच ड्रग्जचे सेवन केले नसून बऱ्याच वर्षांपासून तो ड्रग्ज घेत आहे. (Cruise Drug Case aryan khan takes drugs from many year said ncb )

दरम्यान आजच्या आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद रंगला होता. एनसीबीने सांगितले की, ‘रेकॉर्ड आणि पुराव्याच्या आधारे अनेक वर्षांपासून आर्यन खान ड्रग्जचे सेवन करत आहे. अरबाज खानकडून ड्रग्ज सापडले असून त्याचा स्पष्ट उल्लेख पंचनाम्यात करण्यात आला आहे. हा फक्त आर्यन आणि अरबाजच्या सेवनासाठी होता.’

पुढे आर्यनच्या जामिनाचा विरोध करताना एनसीबीचे वकील अनिल सिंह म्हणाले की, ‘एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत आरोपींना वेगळे करून पाहू शकत आहे. जरी तुमच्याकडे ड्रग्ज मिळाले किंवा नाही मिळाले. तुमच्याकडे काहीही मिळाले नाही, असे सांगून तुम्ही सुटू शकत नाहीत. आम्ही एका आरोपीकडून ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणात २० लोकांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा कट रचला होता. त्यामुळे आरोपींना वेगवेगळे पाहिले जाऊ शकत नाही.’


हेही वाचा – Cruise Drug Case: आर्यन खानला आजही दिलासा नाही! २० ऑक्टोबरपर्यंत आर्यनचा आर्थररोड जेलमध्ये मुक्काम