Cruise Drug Case: Aryan Khanला आजही मिळाला नाही जामीन; गुरुवारी होणार जामिनावर होणार सुनावणी

Cruise Drug Case Court adjourns bail hearing till tomorrow, Aryan to stay in jail tonight
Cruise Drug Case: Aryan Khanला आजही मिळाला नाही जामीन; गुरुवारी होणार जामिनावर होणार सुनावणी

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील (Cruise Drug Case) आरोपी आर्यन खानचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. आर्यन खानच्या जामिनावरील आजची सुनावणी संपली असून उद्या, गुरुवारी पुन्हा आर्यन जामिनावर सुनावणी होणार आहे. आजची रात्रही आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागणार आहे. एनसीबीचे वकील ASG अनिल सिंग उद्या युक्तिवाद पूर्ण करणार आहेत. (Cruise Drug Case Court adjourns bail hearing till tomorrow, Aryan to stay in jail tonight)

आज, बुधवारी मुंबई सेशन कोर्टात आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामीन अर्जावर दुपारी १च्या सुमारास सुनावणी सुरू झाली होती. मात्र आज सुनावणी पूर्ण झाली नाही आहे. उद्या, गुरुवारी १२ वाजता आर्यनसह इतरांच्या जामिनावर सुनावणी सुरू होणार आहे. आज आर्यनच्या बाजूने वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई युक्तीवाद करत होते. यादरम्यान वकील अमित देसाई म्हणाले की, ‘विक्रांत, इष्मीत आणि अरबाज यांच्याकडून ड्रग्स सापडले पण आर्यनकडून नाही. आतापर्यंत जो तपास एनसीबीचा झालायं त्यात ना ड्रग्सची रिकव्हरी आर्यन खानकडे झालीय ना ड्रग्सच सेवन झाल्याचे कळले. ड्रग्सच सेवन करणे, त्याची विक्री करणे हे आरोप आर्यनसाठी लागू होत नाहीत.’

एनसीबीच्या पंचनाम्यानुसार आर्यनकडे ना ड्रग्स सापडले ना पैसे. जर त्याच्याकडे पैसेच नाहीत तर तो ड्रग्स विकत घेऊन सेवन कसे करू शकतो आणि कसे विकत घेऊ शकतो? एनसीबी ड्रग्स प्रकरणात अनेकांना अटक करतेय ही चांगली गोष्ट आहे. पण ज्यांच्याकडे काहीही सापडलं त्यांना असं अडकवून ठेवणे चुकीचं आहे, असे आर्यन वकील म्हणाले.

पुढे वकील अमित देसाई म्हणाले की, ७ तारखेला एनसीबीने आर्यनच्या व्हाट्सअॅप चॅटमध्ये धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा कोर्टात केला. शिवाय आर्यनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आचित कुमारला अटक केल्याचे सांगितले मात्र आचितची अटक आणि क्रूझ पार्टीच कोणतेही कनेक्शन अद्याप समोर येऊ शकले नाही.


हेही वाचा – Aryan Khan Bail Hearing Update: आर्यनकडे ड्रग्ज मिळाले नाही, पण कटात सहभागी; NCB चा युक्तिवाद