Cruise Drug Case: आर्यन खानला आजही दिलासा नाही! २० ऑक्टोबरपर्यंत आर्यनचा आर्थररोड जेलमध्ये मुक्काम

Aryan Khan's bail plea rejected again, lawyers to move high court
Cruise Drugs Case: आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला; आता आर्यनचे वकील हायकोर्टात घेणार धाव

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आजही दिलासा मिळाला नाही. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आजही कोणत्याही निर्णय झाला नाही. २० ऑक्टोबरपर्यंत कोर्टाने निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. यामुळे २० ऑक्टोबरपर्यंत आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये राहावं लागणार आहे. ५ दिवसांनंतर आर्यनला जामीन मिळणार की नाही याचा निर्णय लागणार आहे. (Aryan Khan to stay in jail till Oct 20, judge reserves order on bail)

आज आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा हिच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यादरम्यान न्यायाधीश व्ही.व्ही पाटील यांनी जामीन अर्जांवर निर्णय राखून ठेवत २० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. या दिवशी जामिनावर नक्कीच सुनावणी होईल असे देखील सांगितले आहे. आज सुनावणी दरम्यान एनसीबीचे बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह म्हणाले की, ‘सुरुवातीच्या तपासात आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले. सर्व एकमेकांना कनेक्टेड आहेत. त्यांना वेगवेगळे करून पाहिले जाऊ शकत नाही. आमच्या जवळ व्हॉट्सअॅप चॅट्स आणि इतर पुरावे आहेत.’

आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी यावेळी युक्तीवाद करताना तरुण पिढीच्या वागण्या बोलण्यावरील मुद्दे व्यक्त केले. ते म्हणाले की, आजच्या पिढीतील मुलांची भाषा, इंग्रजी आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यांचे बोलणे एजेंसीला संशयास्पद वाटू शकते. हा मुलगा तुम्हाला वाटतो का, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिकिंगमध्ये सामिल असेल? एजेंसी म्हणाली की, आम्ही MEAच्या संपर्कात आहोत. तुम्ही करा तुमची तपासणी, परंतु हे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.

आणखीन ५ दिवस आर्यनसह इतर आरोपी जेलमध्येच

काल, बुधवारी आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी टळली होती. यावेळेस देखील आर्यनच्या जामिनावरील निर्णय झाला नव्हता. आज आर्यनचा जामिनावर निर्णय होईल असा आशेचा किरण होता. मात्र आजही जामिनावर अंतिम निर्णय न झाल्याने आर्यन खानसह इतर आरोपींच्या पदारात निराशा पडली आहे. आता पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला होणार आहे. पुढील ५ दिवस यांना जेलमध्ये राहावे लागणार आहे. कारण १५ ऑक्टोबरपासून १९ तारखेपर्यंत मुंबई सेशन कोर्टाची सुट्टी आहे. यादरम्यान हायकोर्ट आणि सेशन कोर्ट ५ दिवसांसाठी बंद असते.


हेही वाचा – drugs case : मलिकांचा जावई समीर खानच्या अडचणी वाढणार, NCBची हायकोर्टात याचिका