Cruise Drugs Case: आरोपी परदेशात पुरवणार होते ड्रग्ज, हॉलिवूड कलाकारांच्या चॅटमधून खुलासा

Cruise Drugs Case ncb found numbers of some Hollywood actors in the accused mobile
Cruise Drugs Case: आरोपी परदेशात पुरवणार होते ड्रग्ज, हॉलिवूड कलाकारांच्या चॅटमधून खुलासा

एनसीबीने २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानसह अनेक जणांना अटक करण्यात आली. अजूनही याप्रकरणात संबंधित ठिकठिकाणी छापे टाकले जात आहे. शनिवारी याप्रकरणातील मोठी माहिती एनसीबीच्या हाती लागली. एनसीबीला आरोपींच्या मोबाईलमधील ड्रग्ज चॅट्समध्ये हॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा नंबर मिळाले. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज चॅट्स ट्रेलचा पुरावा म्हणून हे मानले जात आहेत. एका आरोपीने हे नंबर कोड वर्डमध्ये सेव्ह केले होते, असे म्हटले जात आहे.

एनसीबीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपीच्या ड्रग्ज चॅटमध्ये हॉलिवूडच्या कलाकारांसोबत दावा केला आहे की, त्यांना परदेशातही ड्रग्ज पुरवले जाऊ शकतात. एवढेच नाहीतर एका आरोपीच्या ड्रग्ज चॅट्समध्ये बॉलिवूडसंबंधित लोकांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे अनेक नंबर्स मिळाले आहेत. यामध्ये ही ड्रग्ज चॅट्स झाले आहेत.

आरोपींनी ड्रग्ज चॅटमध्ये जास्तीत जास्त ड्रग्ज पुरवण्याचा दावा केला आहे. तसेच आरोपींच्या मोबाईलमध्ये हॉलिवूड-बॉलिवूड स्टारच्या मुलांचे नंबर मिळाले आहेत.

याप्रकरणी शुक्रवारी ८ ऑक्टोबरला आर्यनसह इतर आठ जणांच्या जामीन अर्जावर किला कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा यांच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सध्या आर्यनसह इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.


हेही वाचा – Aryan drug case:आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका, byju’sने बंद केल्या सगळ्या जाहिराती