घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: अटकपूर्व जामिनासाठी सॅम डिसुझाची मुंबई हायकोर्टात धाव

Cruise Drugs Case: अटकपूर्व जामिनासाठी सॅम डिसुझाची मुंबई हायकोर्टात धाव

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील सॅम डिसुझाने आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने केलेल्या गौप्यस्फोटातून सॅम डिसुझाचे नाव समोर आले होते. आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुख खानकडून सॅम डिसुझाच्या माध्यमातून कोट्यावधींची मागणी केली होती, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी कारवाईचा ससेमिरा आपल्या मागे लागतो की काय अशी भीती असल्यामुळे सॅम डिसुझाने आपल्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

डिसुझाने आपल्या अर्जात दावा केला आहे की, या प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीने आर्यन खानची सुटका करण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीकडून ५० लाख रुपये घेतले आणि एनसीबीकडून २३ वर्षीय आर्यनला अटक केल्यानंतर पैसे परत केले होते.तसेच सॅमने असा देखील दावा केला आहे की, गोसावीने त्याला आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसून तो निर्दोष असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

डिसुझाने अर्जात म्हटले की, त्याला याप्रकरणात गोवण्यात आले असून गोसावी आणि त्याचा अंगरक्षक प्रभाकर सैल याप्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) डिसुझाला अटक करून शकते असा त्याचा संशय आहे. त्यामुळे डिसुझाने अटकपूर्व जामीन आणि अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे, अशी भीती अर्जात व्यक्त केली आहे. तसेच डिसुझाने कोणतीही सक्तीची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवसांची नोटीस आणि अटकपूर्व जामीन मागितला आहे.


हेही वाचा –  माझ्याकडे अनिल देशमुखांविरुद्ध खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत; परमबीर सिंह यांचं प्रतिज्ञापत्र


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -