घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: आर्यनसह आठ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, मात्र आजची...

Cruise Drugs Case: आर्यनसह आठ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, मात्र आजची रात्र NCB कोठडीत

Subscribe

उद्या आर्यनसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर होणार सुनावणी

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात आर्यनसह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु उद्याच्या दिवसासाठी आर्यन खानसह सात आरोपींना एनसीबी कोठडीत ठेवले जाणार आहे. मात्र न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आता आर्यन खानचा जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. सर्वांनी सहकार्य केले तर जमिनासाठी अंतिम निर्णय देऊ, असे कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणातील आर्यनसह इतर आरोपींच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.  (Court Sends Aryan Khan Arbaz Merchant and 6 others To 14 Days Judicial Custody)

- Advertisement -

दरम्यान आज सुनावणीच्या वेळी एनसीबीने आर्यन खानसह इतर १६ आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने एनसीबीची ही मागणी फेटाळून लावून आर्यनसह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता २१ ऑक्टोबरपर्यंत आर्यनसह सात जणांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. मात्र यामुळे आर्यन खानला जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेशन कोर्टात जामिनासाठी वकिलांनी धाव घेतली आहे. उद्या आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आजची रात्र एनसीबी कोठडीत

आर्यनसह सात जणांना न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी न्यायालयाला विनंती करून आरोपींना आजची रात्र एनसीबीच्या ताब्यात राहू द्या. आरोपींना एवढ्या उशिरा, तसेच कोविड टेस्ट शिवाय स्वीकारणार नाही, असे सांगितली. त्यानंतर न्यायालयाने समीर वानखेडे यांची ही विनंती मंजूर केली आहे. आर्यनसह सात आरोपी आजची रात्र एनसीबीच्या ताब्यात राहणार आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -