घरमुंबईमुंबईतील एक लाख झाडांच्या फांद्यांची छाटणी, तरीही पडझड सुरुच!

मुंबईतील एक लाख झाडांच्या फांद्यांची छाटणी, तरीही पडझड सुरुच!

Subscribe

मुंबईतील झाडे पडल्याची अनेक घटना घडल्या आहेत. त्यापैकी झाडांच्या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील पावसाळ्यात वादळी वार्‍यांमुळे झाडांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याची कामे हाती घेण्यात आले आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी झाडांच्या फांद्या तुटून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. परंतु आजवर मुंबईच्या रस्त्यालगत असलेल्या निम्म्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे. एवढेच नव्हे तर तब्बल ४९२ मृत झाडे कापण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटदारांच्या माध्यमातून महापालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे कापण्याची कामे पूर्ण केली. यासाठी जुन्याच कंत्राटदारांना मुदतवाढ देवून झाडांच्या फांदया छाटणीची लक्ष्य पूर्ण केले आहे.

मुंबईत सध्या रस्त्यालगत १ लाख ८५ हजार ९६४ झाडे आहेत. त्यातील १ लाख ८१ हजार ८४० झाडांचा सर्वे करण्यात आला आहे. महापालिकेने यातील ९९ हजार ५५२ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे लक्ष्य पूर्ण केले. तर खासगी जमिनींवरील ६ हजार ५७३ झाडांबाबत सरकारी तसेच खासगी इमारती आणि कार्यालयांना छाटणीबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. संपूर्ण मुंबईत केलेल्या सर्वेमध्ये एकूण ४९२ झाडे मृत होती. यासर्व झाडे तोडण्यात आली असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. महापालिकेच्या कामांवर समाधान नसल्याचे वृक्षप्रेमी सिमा खोत यांनी महानगरशी बोलतांना त्यांचे वैयतिक मत स्पष्ट केले. एक तर झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्तपणे छाटणी केली जात नाही. याशिवाय अनेक झाडांची मुळांच्या लादया उखडल्या गेल्या आहेत. उंदिरांनी काही ठिकाणी बिळे पाडली आहे. रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदारांनी झाडांची मुळे तोडून टाकली आहेत, त्यामुळे झाडांच्या योग्य वाढ होत नाही. याबरोबरच खासगी सोसायटी व विकासकांवर महापालिकेचा अंकूश नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

खासगी जागांवरील झाडे कोसळण्याचे प्रमाण अधिक

मागील आठवड्यात १२ ते १४ जून या कालावधीतील सर्वांधिक झाडे तसेच झाडांच्या फांद्या पडण्याचे प्रमाण अधिक होते. या तीन दिवसांमध्ये एकूण ९० झाडे कोसळली, तर २१८ झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तीन दिवसातील कोसळलेल्या झाडांमधील ९० झाडांपैकी २० झाडे ही महापालिकेच्या हद्दीतील, तर ७० झाडे ही खासगी जागेतील होत्या. तर तुटून पडलेल्या २१८ झाडांच्या फांद्यापैकी ९४ झाडे ही महापालिकेच्या ताब्यातील आणि १२४ झाडे ही खासगी जागेतील होत्या. त्यामुळे महापालिकेच्या जागेपेक्षा खासगी जागांवरील झाडे तसेच झाडांच्या फांद्या पडण्याचे प्रकार अधिक असल्याचे आकडेवारींवरुन स्पष्ट होते.

रस्त्यालगतची एकूण झाडे :१ लाख ८५ हजार ९६४
सर्वे केलेली एकूण झाडे : १ लाख ८१ हजार ८४०
कापण्याची आवश्यकता असलेली झाडे :९९ हजार ५५२

- Advertisement -

१२ ते १४ जून दरम्यान पडझड झालेल्या झाडांची संख्या

महापालिकेच्या जागेवरील : २०
खासगी जागेवरील : ७०

मुंबईतील झाडांच्या फांद्याची छाटणी

महापालिकेच्या जागेवरील : ९४
खासगी जागेवरील : १२४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -