घर मुंबई Cyclone : मुंबईला धोका; अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती, IMD चा इशारा

Cyclone : मुंबईला धोका; अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती, IMD चा इशारा

Subscribe

 

मुंबईः खोल अरबी समुद्रात चक्रावादळाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर हे वादळ आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीला हवामान खात्याने अर्लट दिला आहे. चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने किनारपट्टीवर पावसाची शक्यता नाही. पण मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. चक्रीवादळाला बांगलादेशने Biperjoy,असं नाव दिलं आहे.

- Advertisement -

या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास आहे. चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. हे चक्रीवदाळ पुढे सरकत असलं तरी हळूहळू त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचाःMy Mahanagar च्या प्रतिनिधीला धमकी : विविध पत्रकार संघटनांकडून निषेध, काँग्रेसचे मात्र मौन

मान्सूनला चक्रीवादळाचा बसला फटका

४ किंवा ५ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज IMD ने वर्तवला होता. मात्र अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे. १४ केंद्रांवर होणाऱ्या पावसावर मान्सूच्या प्रवासाचा अंदाज लावला जातो. या सर्व केंद्रांवर सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती आहे. पाऊस मात्र एकाच केंद्रावर सुरु आहे. त्यात चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन केव्हा होईल, यामध्ये अजून स्पष्टता नाही, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेली चक्रीवादळाची स्थिती पुढील २४ तासात अधिक तीव्र होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल. या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे केरळमध्ये मान्सून या आठवड्याच्या अखेरीस दाखल होईल व त्यानंतर पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होईल. १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात यंदा चांगला मान्सून

मान्सून यंदा ९६ ते १०४ टक्के अर्थात, सरासरी इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये मध्य भारतात विशेष करून, महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा मान्सून ९६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, वायव्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून ९६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पावसाळ्यात अल निनोची शक्यता ९० टक्के पेक्षा जास्त आहे.

 

- Advertisment -