घरताज्या घडामोडीCyclone Tauktae:वादळामुळे पडलेले वृक्ष, फांद्या अद्यापही जागेवरच

Cyclone Tauktae:वादळामुळे पडलेले वृक्ष, फांद्या अद्यापही जागेवरच

Subscribe

पालिका प्रशासनाकडून वादळामुळे पडलेली झाडे, फांद्या तात्काळ हलविण्यात येत असल्याचा दावा

सोमवारी मुंबईत तोक्ते चक्रीवादळामुळे तब्बल २ हजार ३६४ ठिकाणी झाडे, फांद्या यांची पडझड झाली. मात्र आज गुरुवारचा सुर्यास्त झाला तरी अनेक ठिकाणी पडलेल्या झाडांचे बुंधे, लहान- मोठ्या फांद्या जागेवरच पडून आहेत.
विशेष म्हणजे पालिका मुख्यालयासमोरील ‘आराम’ हॉटेलसमोरील मोठे झाड सोमवारी कोसळले. त्याचे जागेवरच तुकडे करण्यात आले आहेत. मात्र आजही ते उचलले न गेल्याने जागेवरच तसेच्या तसे पडून आहेत. आणखीन धक्कादायक बाब म्हणजे पालिका मुख्यलयासमोर अगदी ४०-५० फुटांवर उभारण्यात आलेल्या १८५७ मधील दोन हुतात्म्यांच्या स्मृती स्मारकाच्या परिसरात कोसळून पडलेले एक छोटे झाडही उचलण्यात आलेले नाही. ते आजही त्याच जागेवर पडून आहे.

हे स्मृती स्मारक माजी खासदार भारतकुमार राऊत यांच्या निधीमधून बनविण्यात आले असून त्याचे उदघाटन शिवसेनेचे नेते व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईच्या तत्कालीन महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यामुळे दिव्याखालीच अंधार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. मात्र पालिका प्रशासनाने वादळामुळे पडलेली झाडे, फांद्या तात्काळ हलविण्यात येत असल्याचा दावा केला आहे. तसेच, झाडे कमी व फांद्या जास्त प्रमाणात पडल्याचे मान्य केले आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये चक्रीवादळामुळे झाडे- फांद्या कोसळून पडल्याच्या एकूण २ हजार ३६४ घटना घडल्या. यामध्ये, शहर भागात ६६६ ठिकाणी, ५९५ तक्रारी पूर्व उपनगरात ५९५ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात १ हजार १०३ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याची नोंद पालिकेकडे करण्यात आली आहे. घाटकोपर येथील भटवाडी, गोळीबार रोड, सर्वोदय रुग्णालय आदी काही ठिकाणी झाडे, फांद्या कोसळून आजपर्यंत ते जागेवरून उचलण्यात आलेले नाही.


हेही वाचा – Cyclone Tauktae: चक्रीवादळातील मृतांच्या वारसदारांना मिळणार २ कोटींची मदत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -