घर मुंबई नागपाड्यात चहाच्या दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट; जीवित हानी नाही

नागपाड्यात चहाच्या दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट; जीवित हानी नाही

Subscribe

मुंबईः मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या लहान / मोठ्या घटना सुरूच आहेत. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपाडा येथे एका चहाच्या दुकानात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. सुदैवाने चहा विक्रेत्याने व ग्राहकांनी वेळीच दुकानाबाहेर धाव घेतल्याने ते थोडक्यात बचवल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, नागपाडा, दिमतीमकर मार्ग, गुडलक मोटर ट्रेनिंग स्कुल येथील चारमजली रसूल इमारतीच्या तळमजल्यावर एक चहाचे दुकान आहे. या दुकानात दररोज ग्राहक चहा प्यायला गर्दी करतात. मात्र बुधवारी रात्री ९.५० वाजताच्या सुमारास दुकानातील गॅस सिलिंडरमधून गॅसची गळती होत असल्याचे दुकानातील चहा विक्रेत्याला निदर्शनास आले. त्याने त्या गॅस सिलिंडरमधील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही.

नंतर गॅस गळती अधिक वाढली त्यामुळे भितीपोटी चहा विक्रेत्याने व ग्राहकांनीही दुकानाच्या बाहेर धाव घेतली. काही अवधीतच गळती लागलेल्या गॅस सिलिंडरमधील गॅसचा आगीशी संपर्क झाला आणि आग लागली. ही आग वाढली व गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे आगीचा भडका उडाला. त्याबरोबर तेथे जमलेल्या नागरिकांनी घटनास्थळापासून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

- Advertisement -

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. फायर इंजिन व वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर अवघ्या १० – १५ मिनिटात नियंत्रण मिळविले व आग विझविली. यावेळी, अग्निशमन दलाने सदर दुकानातून आणखीन चार गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मात्र याप्रकरणी स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेबाबत व गॅस गळतीबाबत चौकशी सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. काही वेळासाठी विभागात भीतीचे वातावरण होते.

काँग्रेसचे माजी नगरसेवक जावेद जुनेजा यांनी, घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य करून घेण्यास सूचना केल्या. मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती जावेद जुनेजा यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -