घरताज्या घडामोडीकरोनामुळे मुंबईच्या डब्बेवाल्यांची सेवा बंद

करोनामुळे मुंबईच्या डब्बेवाल्यांची सेवा बंद

Subscribe

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील डब्बेवाल्यांची सेवा बंद केली आहे. २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत सेवा बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील करोग्रस्तांची संख्या ४९वर पोहचली आहे. मुंबईतील नोकरदरांना जेवणाचे डब्बे घरापासून त्याच्या ऑफिसपर्यंत नेण्याचे काम मुंबईचे डब्बेवाले करत असतात. मात्र आता करोनाच्या पार्श्वभूमीवर १३० वर्षांतून पहिल्यांदाच डब्बेवाल्यांची सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. मुंबई डब्बेवाला असोसिएशन कडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाच्या व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईसह राज्यात करोनाचा सामना करण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आळी आहे. तसंच अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली आहे. याशिवास खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या आदेश देखील दिला आहे.

- Advertisement -

जगभरात आतापर्यंत २ लाख २० हजार ३६० करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार ९५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच यापैकी ८४ हजार ९२९ करोनाग्रस्त रुग्ण रिकव्हर झाले आहेत. या करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यातील करोना बाधितांचा आकडा ४९; नगरमधील एकाला लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -