Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई दादा तुम्ही आमच्या हक्काचे, आम्हाला असं बोलून परकं करू नका - सुषमा...

दादा तुम्ही आमच्या हक्काचे, आम्हाला असं बोलून परकं करू नका – सुषमा अंधारे

Subscribe

मुंबई : काही दिवसांपूर्वी साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर बोलताना अश्रू अनावर झाले होते. याबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, अंधारे यांनी माझा उल्लेख करण्यापेक्षा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार केली पाहिजे, असा टोला लगावला होता. परंतु सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, दादा तुम्ही आमच्या हक्काचे, आम्हाला असं बोलून परक करू नका.

सुषमा अंधारे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम अराजकीय कार्यक्रम होता. ज्या भटक्या मुक्त संघटनेचा कार्यक्रम होता, त्या संघटनेची गेली 40 वर्ष पालकत्व आणि सल्लागार म्हणून शरद पवार जबाबदारी पार पाडत आहेत. त्या कार्यक्रमात मी अजित पवार यांचा अजिबात उल्लेख केला नाही. विरोधी बाकावरच्या सगळ्याच लोकांसाठी अपेक्षित म्हणून मी गाऱ्हणं केले होतं. पण अजित पवारांना सांगू इच्छिते की, दादा तुम्ही आमच्या हक्काचे आहात. तुम्ही आमच्या जवळचे आहात. तुमच्या जवळ आम्ही अत्यंत आपुलकीन बोलतो. महाविकास आघाडीतला ज्येष्ठ नेता म्हणून बोलतो. त्या दिवशी आपल्या नावाचा उल्लेख नव्हता, परंतु आपण आमच्या जवळ का बोलताअसं म्हणून आम्हाला परक करू नये. दादा तुम्ही आमच्यासाठी फार हक्काचे आहात. आमच्या जवळचे आहात. त्यामुळे अजित पवार आज जे काही बोलले त्यात मला काही वावगं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

- Advertisement -

अजित पवार काय म्हणाले होते?
सुषमा अंधारे ठाकरे गटात आहेत आणि ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांच्याकडे विधानपरिषदचे विरोधीपक्षनेते पद आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांच्यासमोर रडण्यापेक्षा ज्या पक्षाकरता त्या बाबा रे, काका रे, मामा रे करतात. त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख करण्यापेक्षा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार केली पाहिजे. जेवढा विधानसभेच्या विरोधी पक्षाला अधिकार आहे, तेवढाच अधिकारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यालाही आहे. त्यामुळे तिथं रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडला असता आणि अंबादास दानवेंसमोर प्रश्न उपस्थित केला असता, तर जास्त योग्य झालं असतं, असा टोला अजित पवार यांनी सुषमा अंधारेंना लगावला होता.

काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांच्यासमोर बोलताना सुषमा अंधारे अश्रू अनावर झाले होते. त्यांनी सांगितले की, इथे राजकारणाचा विषय नाही, पण अश्लाघ्य पद्धतीने जेव्हा आमदार माझ्यावर टीका करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध तक्रार लिहून घेतली जात नाही. मला अपेक्षित होतं की, सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. त्यामुळे तक्रार का लिहून घेतली नाही? खरे की खोटं? पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट असल्यामुळे सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता, असे म्हणत सुषमा अंधारे यांना भावनिक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, माझ काही चुकत असेल तर मी कान पकडते. मी लाखवेळा माफी मागायलासुद्धा तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोलते आहे. कारण आता जे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते शिंदे गटाचे आहेत. जे बायकांबद्दल इतका हिणकस दृष्टीकोन बाळगतात, इतक्या अश्लाघ्य पद्धतीने बोलतात. या सगळ्या लोकांमध्ये प्रचंड मनुवादी दृष्टीकोन वाढलेला आहे. यांना सत्तेवरुन खाली खेचायचं असेल तर महाविकास आघाडी असायला हवी. महाविकास आघाडी असेल तर ती मोट बांधून राहील आणि त्यासाठी तुम्ही असायला हवे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.

- Advertisement -

 

- Advertisment -