घरCORONA UPDATEदादरमध्ये 'कोरोना'चे तीन नवे रुग्ण; दोन नर्स कोरोनाबाधित

दादरमध्ये ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण; दोन नर्स कोरोनाबाधित

Subscribe

मुंबईतील दादरमध्ये आता तीन नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णालयातील दोन नर्सना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका ८० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील दादरमध्ये आता तीन नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णालयातील दोन नर्सना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका ८० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता दादरमधील कोरोनाची संख्या ६ वर गेली आहे. तसेच या रुग्णालयाला सील करण्यात आले आहे. तर धारावीतही कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोन नर्सना झाली कोरोनाची लागण

दादर येथील एका रुग्णालयतील दोन नर्सना कोरोनाची लागण झाली असून एक २७ तर दुसऱ्या नर्सचे ४२ वय आहे. त्यामुळे आता अधिक संसर्ग होऊ नये, याकरता रुग्णालय सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

धारावीत कोरोनाची संख्या वाढली

धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. धारावीत नवे पाच रुग्ण आढळल्याने धारावीतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या २२ वर पोहोचली आहे. त्यापैकी दोघे जण दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या तबलिगींची पोलिसांनी यादी काढली होती. त्यामुळे दोघेही आधीपासूनच क्वॉरंटाइन होते.

- Advertisement -

धारावीत एकाचा मृत्यू

धारावीत सापडलेल्या पाच रुग्णांपैकी एक महिला मुंबईतील रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरची पत्नी असल्याचे समोर आले आहे. तसेच धारावीत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिका तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.


हेही वाचा – धक्कादायक! डॉक्टरच्या चुकीमुळे कोरोनाग्रस्ताचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -