घरताज्या घडामोडीदादरच्या भाजीमार्केटचे विकेंद्रीकरण; येत्या रविवारपासून बाजार तात्पुरता बंद

दादरच्या भाजीमार्केटचे विकेंद्रीकरण; येत्या रविवारपासून बाजार तात्पुरता बंद

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीमार्केटमध्ये गर्दी करुन नये, याकरता दादरचे भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर भरल्या जाणाऱ्या घाऊक भाजी मार्केटमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांनी सुरक्षित अंतर राखण्यासाठी योग्य नियोजन केल्यानंतरही ही गर्दी रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे दादरचे हे घाऊक मार्केट तात्पुरत्या स्वरुपात बंद करून त्याचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. भाजी मार्केटसाठी सोमय्या मैदान, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान, मुलुंड जकात नाका, दहिसर जकात नाका आदी ठिकाणी या शेतकऱ्यांसाठी भाजी मार्केट उपलब्ध करून देत ठराविक भागातील भाजी विक्रेत्यांना जवळच्या जवळ भाजी खरेदी करण्यास उपलब्ध करून दिली जात आहे. याची अंमलबजावणी २९ मार्चपासून केली जाणार असून आता घाऊक आणि किरकोळ भाजीविक्रेत्यांना भाजी खरेदीसाठी दादरला न जाता आपल्या जवळच्या भागांमध्ये जावे लागणार आहे.

उपनगरांमध्ये चार ठिकाणी बसणार बाजार

दादर येथील घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये दरदिवशी राज्याच्या विविध जिल्ह्यामधून घाऊक विक्रीसाठी येत असतात. दरदिवशी राज्यातील अनेक भागांमधून मुंबईतील दादर भागांमध्ये भाजीचे २०० ट्रक येतात. तसेच छोट्या,मोठ्या वाहनांमधून १ हजार भाजी विक्रेते याठिकाणी येत असल्याने याठिकाणच्या गर्दीचे प्रमाण नियंत्रण विविध उपाययोजना करूनही ही गर्दी कमी करण्यात महापालिका आणि पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे हतबल ठरलेल्या महापालिकेने हे भाजी मार्केट तात्पुरत्या स्वरुपात बंद करून त्याचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सेनापती बापट मार्ग, दादर रेल्वे स्टेशन (प) येथील दादर भाजी मार्केट येथे विविध उपाययोजना करुनही याठिकाणी गर्दी कमी होत नाही. हजारोंच्या संख्येने शुक्रवारी याठिकाणी अनेक घाऊक व्यापारी दाटीवाटीने भाजीपाला खरेदी करताना आढळले. त्यामुळे ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने येथील भाजी मार्केट तात्पुरत बंद करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठीचा आराखडा महापालिका आणि पोलीस प्रशासन करत असून या मार्केटचे विकेंद्रीकरण करुन सोमय्या मैदान, वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदान, मुलुंड जकात नाका, दहिसर जकात नाका येथे स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. स्थानिक पातळीवर महानगरपालिका, ए.पी.एम.सी. मार्केट आणि पोलीस यांची बैठक झाली असून महापालिका अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांच्या स्वाक्षरीनुसार या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ठिकाण : सोमय्या मैदान

  • भाजीपाला घेऊन येणारी वाहने : पुणे व नाशिक
  • भाजीपाला विकत घेणारे व्यापारी :घाटकोपर ते माटुंगाठिकाण : एमएमआरडीए मैदान,बीकेसी
  • भाजीपाला घेवुन येणारी वाहने : पुणे व नाशिक
  • भाजीपाला विकत घेणारे व्यापारी : वांद्रे ते गोरेगाव

ठिकाण : मुलुंड जकात

- Advertisement -
  • भाजीपाला घेवुन येणारी वाहने : पुणे व नाशिक
  • भाजीपाला विकत घेणारे व्यापारी: मुलुंड ते घाटकोपर

    ठिकाण : दहिसर जकात नाका

  • भाजीपाला घेवुन येणारी वाहने : वसई, विरार
  • भाजीपाला विकत घेणारे व्यापारी: दहिसर ते मालाड

    ठिकाण : दादर सेनापती बापट मार्ग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -