घरताज्या घडामोडीशिवाजी पार्कात रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अप्रिय घटनांना बसणार आळा, दादर पोलिसांनी उचलली...

शिवाजी पार्कात रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अप्रिय घटनांना बसणार आळा, दादर पोलिसांनी उचलली महत्त्वाची पाऊलं

Subscribe

फेब्रुवारी २०२१ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे आतापर्यंत मोबाईल चोरी, बॅग पुलिंग एनडीपीएस सारख्या तक्रारी आलेल्या नाहीत

दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात नेहमीच लोक फिरण्यासाठी येत असतात. शिवाजी पार्क बीचवर मोबाईल चोरी,बॅग चोरी,इव्ह टिझींगसारख्या अनेक घटना घडत असतात त्याचप्रमाणे समुद्राकिनाऱ्यावर वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या जोडप्यांना त्रास देणे, त्यांचे मोबाईल चोरी अशा अनेक घटना दादर पोलिसांकडे आल्या आहेत. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी दादर पोलिसांनी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. दादर पोलिसांनी शिवाजी पार्क बीचवर २५ फ्लड लाइट्स आणि २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे समुद्रावर रात्री संपूर्ण भागात प्रकाश असतो त्यामुळे समुद्राकिनारी होणाऱ्या अप्रिय घटनांवर सीसीटिव्हीच्या माध्यमातून नजर ठेवता येते. फेब्रुवारी २०२१ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे आतापर्यंत मोबाईल चोरी, बॅग पुलिंग एनडीपीएस सारख्या तक्रारी आलेल्या नाहीत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Dadar police has taken important step to curb the unpleasant incidents at night in Shivaji Park)

दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क परिसरात रात्रीच्या अंधारात मोबाईल चोरी,बॅग चोरी, समुद्रावर फिरायले आलेल्या जोडप्यांना त्रास देणे, मुलींवर भाष्य करणे त्याचप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करण्याचे प्रकार वारंवार घडत होते. त्यासंबंधीच्या अनेक तक्रारी पोलिसांत दाखल होत होत्या. मात्र समुद्रकिनाऱ्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ह कॅमेरे आणि लाईट्समुळे या सर्व प्रकारांवर आळा बसला आहे. समुद्रावर होणाऱ्या या अप्रिय घटना कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

शिवाजी पार्क चौपाटीवर २०१८मध्ये ९ तर २०१९मध्ये ७ आणि २०२०मध्ये ७ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र २०२१मध्ये मध्ये लावण्यात आलेल्या २० लाईट्स आणि सीसीटीव्ह कॅमेरामुळे समुद्रकिनाऱ्यावरील रात्रीच्या वेळेस चालणारे अवैध प्रकार, चोरी सारख्या घटनांवर लक्ष ठेवणे सोपे झाले. फेब्रुवारी २०२१नंतर अशाप्रकारचा कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. रात्री शिवाजी पार्क चौपाटीवर येणारे लोक हे सीसीटीव्ही निगराणीखाली असतात.


हेही वाचा – Milkha Singh passed away: भारताचे Flying Sikh मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -