राशीभविष्य: शनिवार ३० जुलै २०२२

daily horoscope horoscope saturday 30 july 2022
daily horoscope horoscope saturday 30 july 2022

मेष : दिशाहिन होण्याची गरज नाही. मुलांची मदत मिळेल. जुना वाद मिटवता येईल. नातलग भेटतील.

वृषभ : अडचणी येतील. अचानक पाहुणे आल्याने तुमचा ठरलेला कार्यक्रम बदलावा लागेल. खर्च होईल.

मिथुन : आज ठरविलेले काम करून घ्या. भेट घेण्यात यश मिळेल. स्पर्धेत जिंकाल. धंदा वाढेल.

कर्क : तुमच्या कार्यात सर्वांची मदत घेता येईल. कल्पनाशक्तीचा उपयोग करून घेता येईल.

सिंह : कलाटणी देणारी घटना धंद्यात, नोकरीत घडेल. वाद मिटवता येईल. उत्साह वाढेल.

कन्या : वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. प्रकृतीची काळजी घ्या. हाय बीपीकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ : आजचे काम आजच करा. आळसाने काम वाढेल. घाई गडबड न करता निर्णय घ्या.

वृश्चिक : घरगुती कामाची गर्दी होईल. धंद्यात धावपळ करावी लागेल. गोड बोलून तुम्हाला फसवले जाईल.

धनु : महत्त्वाची भेट घेता येईल ती घ्या. वाटाघाटीत फायदा होईल. स्पर्धेत प्रगती होईल.

मकर : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. पदाधिकार मिळेल. कोर्ट केस लांबणीवर टाकू नका.

कुंभ : उद्याचा प्रश्न आजच सोडवा. धंद्यात चांगली बातमी मिळेल. मौज-मजेसाठी वेळ काढा.

मीन : प्रगतीचा नवा मार्ग तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मिळेल. थकबाकी वसूल करा. मोहात अडकाल.