घरमुंबईदुधाच्या प्रश्नावर उद्या होणार बैठक

दुधाच्या प्रश्नावर उद्या होणार बैठक

Subscribe

दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी करत या मागणीवर उद्याच्या बैठकीत होणार चर्चा

दूध दराच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने सोमवारी छेडलेल्या आंदोलनाची दखल घेत दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. राज्यात गेल्या चार महिन्यापासून ‘कोरोना’मुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दुधाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत. या मागणीवर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

भाजपने स्‍वतःविरोधात आंदोलन करावे: थोरात

दरम्यान, दुधाच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या भाजप आणि मित्र पक्षांवर काँग्रेसने टीका केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची परवड ही भाजप सरकारचेच पाप असून भाजपला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपने आता स्वतःच्या विरोधात आंदोलन करून पापक्षालन करावे, अशी जळजळीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षात केंद्रातील आणि राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे दूध खरेदी करून ते भुकटीच्या रूपात साठवण्याचा निर्णय घेऊन अंमलात आणला आहे. देशात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी उपलब्ध असताना मोदी सरकारने १० हजार मेट्रिक टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला असून तो शेतकऱ्यांच्या मूळावर उठणारा आहे. यामुळे दुधाचे भाव ८ ते ९ रुपयांनी पडतील, अशी भीती थोरात यांनी व्यक्त केली आहे.


दुध दराच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक; १ ऑगस्टपासून आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -