घरमुंबईCorona: झोपडपट्टी आणि दाट वस्तीत कोरोनासाठी धोक्याची घंटा...

Corona: झोपडपट्टी आणि दाट वस्तीत कोरोनासाठी धोक्याची घंटा…

Subscribe

झोपडपट्टी मुक्त शहर कागदावरच...

स्मार्ट शहराची स्वप्न रंगविणा-या ठाणे आणि ठाणेपल्याड शहरात कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले आहे. ठाणे जिल्हयात कोरोनाबाधित रूग्ण संख्येने दोन हजाराचा टप्पा गाठला आहे. फक्त ठाण्यात हा आकडा साडेसहाशे पार झाला आहे. ठाण्यात झोपडपट्टी आणि दाट वस्तीच्या परिसरात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे ठाण्यासह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आदी दाटवस्तीच्या परिसरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे, गोरगरीब झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने बीएसयूपी योजना आणली. मात्र ठाणे जिल्हयातील अनेक शहरात ही योजना बारगळल्याने या योजनेचा फियास्को झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त शहराचा शासनाचा हेतू सफल झालेला दिसून येत नाही.

ठाण्यात झोपडपट्टी व दाट वस्तीत कोरोनाचा धोका वाढलेला दिसून येत आहे. ठाणे शहर, कळवा, मुंब्रा परिसरातील झोपडपट्टीत मोठया संख्येने रूग्ण संख्या वाढत आहे. वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर, सीपी तलाव परिसर, लोकमान्य नगर परिसरातील काजूवाडी, रामचंद्र नगर पाडा नंबर २३४ , सावरकर नगर, उथळसर येथील क्रांतीनगर, गांधीनगर कळवा येथील वाघाोबा नगर महात्मा फुले नगर मफतलाल कंपनी परिसरातील झोपडयांमध्ये तसेच मुंब्रा परिसरातील संतोष नगर व संजय नगर इत्यादी वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. अत्यंत दाटीवाटीचा व मोठया लोकवस्तीचा हा परिसर आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पालिका प्रशासनाकडून या परिसरात लॉकडाऊन संपूर्णत: कडक करण्यात आला आहे. केंद्रीय पथकाने ही ठाण्याची पाहणी केल्यानंतर झोपडपट्टी व दाटवस्तीच्या परिसरात सर्तकता बाळगण्याच्या सुचना दिल्या ओहत. झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालये व परिसर स्वच्छतेविषयीच्या सूचना केंद्रीय पथकाकडून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

वागळेनगर लोकमान्य नगर सावरकरनगर समता नगर वर्तकनगर शास्त्रीनगर हा संपूर्ण परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. याठिकाणी कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र नागरिकांची जागरूकता महत्वाची आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने पालिका प्रशासनाने सर्व परिसर सील केेले आहेत.

केंद्र व राज्य शासनाकडून झोपडपट्टी पूर्नवसन योजनेतंर्गत गरीब नागरिकांसाठी घरकूल योजना (बीएसयुपी) राबविण्यात आली. झेापडपट्टींचा विकास व्हावा या हेतूने प्रत्येक महापालिका क्षेत्रात ही योजना राबविण्यात आली पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या योजना अर्धवट अवस्थेत रखडून राहिल्या आहेत. मोदी सरकराच्या काळात बीएसयुपी योजना बंद करून तिचे नामकरण करून भाजप सरकाने पंतप्रधान आवास योजना केली. ठाण्यात सर्वाधिक झोपडया मुंब्रा चेंदणी पाचपाखाडी माजीवडा पारसिक नौपाडाया भागात आहेत. ठाण्यात साधारण दोन लाख झोपडया असून, सात ते आठ लाख नागरिक झोपडपट्टी भागात वास्तव्य करीत आहेत.

- Advertisement -

केडीएमसी हद्दीतही ठाण्यात बीएसयुपी अंतर्गत तुलसीधाम सिध्दार्थ नगर महात्मा फुले नगर रिवरवुड खारटन पडले गाव ब्रम्हांड गाव कासारवडवली टेकडी बंगला आदी परिसरात सुमारे सहा हजार घरांपैकी साडेतीन हजार घरांची कामे पूर्ण करून लाभार्थींना वाटप केली मात्र अनेकांनी घर भाडयाने व विकल्याचेही प्रकरण समोर आले. ठाण्यात बीएसयुपी योजनेच्या सदनिका वितरणात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोपही झाले. तर केडीएमसीत बीएसयुपी योजनेतंर्गत ७ हजार घरांपैकी पालिकेने कशीबशी तीन हजार घरे बांधून पूर्ण केली आहेत. त्यातील एक हजार ४७८ लाभार्थींना घरे वाटप करण्यात आली आहेत. उरलेली अडीच हजार घरे अजूनही वाटपाच्या प्रतिक्षेत आहेत. झोपडपट्टी मुक्तीच्या दिशेने पावले उचलली मात्र झोपडपट्टी मुक्त शहर हे कागदावरच राहिलेला आहे. त्यामुळे ठाण्याप्रमाणेच इतर दाटीवाटीची वस्ती असलेल्या शहरांनाही कोरोनाचा धोका ओळखून सर्तक राहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -