घरमुंबईभिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; एका महिलेचा मृत्यू

भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; एका महिलेचा मृत्यू

Subscribe

भिवंडीमध्ये खोणी ग्राम पंचायत हद्दीत रसुलाबाद येथे तीन मजल्याची इमारत कोसळ्याने यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर घटनेमध्ये सात जण जखमी झाले आहे. मात्र ही इमारत दुपारीच रिकामी करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्राम पंचायत हद्दीत रसुलाबाद येथे तीन मजल्याची धोकादायक इमारत मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने हि इमारत ग्राम पंचायत प्रशासनाने दुपारीच खाली केली होती. मात्र इमारतीच्या बाजूला असलेल्या चाळीवर इमारत कोसळल्याने चाळीतील सात रहिवासी या दुर्घटनेत जखमी झाले असून यामध्ये सहा आणि सात वर्षांची दोन लहान मुले देखील जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जखमींवर स्व. इंदिरा गांधी सुती रुग्णालयात उपचार सुरु असून मरियम जरार शेख, मो युसूफ सरदार, मेहरूंनीसा शेख अशी या जखमींची नावे आहेत.

धोकादायक इमारतीची भिंत खचली

धोकादायक इमारतीचा मंगळवारी दुपारी एक भाग खचला होता. त्यामुळे खोणी ग्रामपंचायत प्रशासनाने ही इमारत दुपारीच खाली केली होती. जमीन मालक गुल्लू नाखवा असे या जमीन मालकाचे नाव असल्याने गुल्लू नाखवाची चाळ या नावाने हि इमारत ओळखण्यात येत होती. तर फैजन सुसे असे बिल्डरचे नाव आहे. तीन मजल्याच्या या इमारतीत एकूण ३२ वन रुम किचन खोल्या होत्या अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे. तर या इमारतीखाली आणखी कोणी अडकले असण्याची शक्यता असल्याने हा ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -