घरCORONA UPDATEअंतिम वर्षाची परिक्षा घेणे घातक ठरु शकते; हायकोर्टाचा इशारा

अंतिम वर्षाची परिक्षा घेणे घातक ठरु शकते; हायकोर्टाचा इशारा

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे विद्यार्थ्यांच्यादृष्टीने घातक ठरू शकते, असे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. राज्य सरकारने १९ जून रोजी घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात एका याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने आपली भूमिका व्यक्त केली. राज्य सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करुन १० लाख विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन पदवी देण्याचा निर्णय घेतला होता.

या सुनावणी दरम्यान राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोर्टाला सांगितले की, राज्यातील अनेक ठिकाणच्या महाविद्यालयाच्या इमारती आयसोलेशन सेंटरसाठी वापरण्यात आलेल्या आहेत. तर विद्यापीठांच्या कुलगुरुंचे म्हणणे आहे की, अशा वातावरणात परिक्षा घेणे अवघड आहे. त्यामुळे राज्य सरकारने अतिशय विचारपुर्वक परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -