घरट्रेंडिंगकसाबचा जीव दाऊद इब्राहीमच घेणार होता - राकेश मारिया

कसाबचा जीव दाऊद इब्राहीमच घेणार होता – राकेश मारिया

Subscribe

कसाबला अनेकदा भारत माता की जय म्हणायला भाग पाडल

केंद्रातील इंटेलिजन्स एजन्सीज मार्फत कसाबच्या जीवाला धोका आहे अशी माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी दाऊनने आपली माणसही कामाला लावली होती. पण मुंबई पोलिसांची शान आणि माझे कर्तव्य हे सगळच त्यावेळी पणाला लागले होते. त्यावेळी काहीही घडू शकले असते असा उल्लेख राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

भारत माता की जय बोलायला भाग पाडले

खाली वाकायलाा सांगून आणि जमीनीला डोक टेकायला सांगून २६/११ दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानी हल्लेखोर अजमल कसाबला भारत माता की जय बोलायला भाग पाडल्याचा खुलासा माजी मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात ज्या ठिकाणी पोलिसांना मारण्यात आले त्या मेट्रो जंक्शन नजीक नेऊन कसाबला भारत माता की जय म्हणायला भाग पाडल्याचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या लेट मी से इट नाऊ या पुस्तकात केला आहे. भारतात मुस्लिम बांधव हे मुक्तपणे आपल्या धार्मिक प्रार्थना करू शकतात हेदेखील कसाबला एका मशीदीत नेऊन दाखवल्याचा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisement -

संपुर्ण २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा घटनेचा उलघडा करण्यासाठी कॉनवॉय हा मेट्रो जंक्शनच्या ठिकाणी आला तेव्हा मी कसाबला एक नव्हे तर दोन वेळा भारत माता की जय म्हणायला भाग पाडले असा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात आहे.
माझ्या सहकाऱ्यांना आणि नागरिकांना ज्याठिकाणी मारण्यात आले त्याठिकाणीच त्याला जमीनीला डोक टेकायला सांगून त्याला घोषणा द्यायला लावल्याचा दावा त्यांनी केला आहे. कसाबला लहानपणापासूनच सांगण्यात आले होते की भारतात मुस्लिमांना धार्मिक प्रार्थना मुक्तपणे करण्यासाठी मिळत नाही. तसेच भारतातील मशिदी बंद करण्यात आल्याचेही त्याला सांगण्यात आले होते.

क्राईम ब्रांचच्या लॉकअपमध्ये जेव्हा कसाबला ठेवण्यात आले होते तेव्हा दिवसाला पाचवेळा अझान एकू येत होती, पण हे सगळ काल्पनिक असल्याचे त्याचे मत होते. जेव्हा हे राकेश मारिया यांना कळाले तेव्हा त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रमेश महाले यांना सांगून मेट्रो सिनेमा नजीकच्या मशीदीत एका गाडीतून पाठवले. जेव्हा मुस्लिम धर्मीय हे नमाज पठण करत आहेत हे त्याने पाहिले तेव्हा त्याचा खूपच गोंधळ उडाला असाही उल्लेख पुस्तकात आहे.

- Advertisement -

कसाब हा चौथीपर्यंत पाकिस्तानतल्या उर्दु माध्यमाच्या शाळेत शिकला होता. पण त्याचा ब्रेनवॉश करण्यात आला होता. तसेच त्याच्या गरीबीमुळे त्याला रावळपिंडी येथे दहशतवादी संघटनेसाठी काम करावे लागले असे आत्मचरित्रात नमुद करण्यात आले आहे.

मारिया कसाबशी पंजाबीतही बोलले
राकेश मारिया जेव्हा पहिल्यांदा कसाबला भेटले तेव्हा त्यांनी कसाबला पंजाबीत विचारले की ‘किथोंदा मुंडा है तु’ ? त्यावेळी कसाबने उत्तर दिले की ओकरा. पाकव्याप्त पंजाबमधील हे ठिकाण आहे. पण नंतर चौकशीत मिळालेल्या माहितीत कसाब हा पाकिस्तानातील फरीदाकोट या भागतला असल्याचे उघडकीस आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -