घर मुंबई कराची विमानतळ आता दाऊदच्या ताब्यात?; डी गॅंग आणि नातलगांना मिळतो थेट प्रवेश

कराची विमानतळ आता दाऊदच्या ताब्यात?; डी गॅंग आणि नातलगांना मिळतो थेट प्रवेश

Subscribe

दाऊदला भेटायला जायचे असल्यास त्याचे हस्तक व नातलग दुबईत किंवा अन्य गल्फ देशात जातात. तेथून ते पाकिस्तानात जातात. पाकिस्तानात गेल्यानंतर कराची विमानतळावर त्यांची तपासणी होत नाही. इमिग्रेशनची कोणतीच अट त्यांना लागू होत नाही. विमानतळ अधिकारी त्यांना व्हीआयपी प्रवेशद्वारातून घेऊन जातात. त्यांच्या पासपोर्टवर कोणताच शिक्का मारला जात नाही. त्यामुळे त्यांच्या पाक भेटीचा तपशील राहत नाही.

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा पाकिस्तान करत असला तरी कराची विमानतळावर डी गॅंगला मुक्त प्रवेश मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमिग्रेशनची कोणतीच अट डी गॅंग व दाऊदच्या नातलगांना लागू होत नाही. त्यामुळे दाऊद किंवा छोटा शकीलला पाकमध्ये भेटायला गेलेल्या कोणत्याच व्यक्तिचा तपशील उपलब्ध होत नसल्याची मीहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात उघड झाली आहे.

दाऊद पाकिस्तानमध्ये लपला असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांकडे आहे. पाकिस्तानने हे मान्य करत नाही. त्यात एनआयएच्या तपासात कराची विमानतळाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाऊदला भेटायला जायचे असल्यास त्याचे हस्तक व नातलग दुबईत किंवा अन्य गल्फ देशात जातात. तेथून ते पाकिस्तानात जातात. पाकिस्तानात गेल्यानंतर कराची विमानतळावर त्यांची तपासणी होत नाही. इमिग्रेशनची कोणतीच अट त्यांना लागू होत नाही. विमानतळ अधिकारी त्यांना व्हीआयपी प्रवेशद्वारातून घेऊन जातात. त्यांच्या पासपोर्टवर कोणताच शिक्का मारला जात नाही. त्यांच्या पाक भेटीचा तपशील राहत नाही. पाक भेटीचा कोणताच पुरावा मिळत नाही, अशी माहिती एनआयएच्या तपासात उघड झाली आहे.

- Advertisement -

एवढचं काय तर दाऊदची भेट झाल्यानंतर त्या पाहुण्यांना पाकिस्तानकडून दुबई किंवा अन्य देशाचे तिकिट दिले जाते. त्यावेळीही त्यांचा विमानतळ प्रवेश व्हीआयपी असतो. कोणतीच तपासणी केली जात नाही. त्यांना विमानतळावर थेट प्रवेश दिला जातो. दाऊदला भेटण्यासाठी कोण पाकिस्तानात आले व गेले याचा तपशीलच मिळत नाही.

छोट शकील व सलिम फ्रुट हे नातलग आहेत. दोघांच्या पत्नी या बहिणी आहेत. छोट्या शकीलच्या मुलींच्या निकाहसाठी सलिम फ्रुटची पत्नी पाकिस्तानला गेली होती. विमान प्रवासाचा तपशील कळू नये म्हणून तिने दुबई मार्गे असाच पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्याची कबुलीही तिने तपास यंत्रणांकडे दिली आहे.

- Advertisement -

छोटा शकीलची मोठी मुलगी जोयाचा साखरपुडा २०१३ मध्ये झाला. तेव्हा फ्रुटच्या पत्नीने दुबईला जाणाऱ्या कनेक्टिंग विमानाची तिकिटे काढली होती. ते कराची विमानतळाला गेले तेव्हा छोटा शकीलचा हस्तक त्यांना विमानतळावर घेण्यासाठी आला होता. त्यावेळी विमानतळावर इमिग्रेशनची कोणतीच प्रक्रिया केली नसल्याची कबुली फ्रुटच्या पत्नीने तपास यंत्रणांना दिली. जोयाच्या साखरपुड्याला छोटा शकील हजर होता. तो निकाहला नव्हता, असेही फ्रुटच्या पत्नीने तपास यंत्रणांना सांगितले. मात्र छोटा शकीलच्या मुलीच्या विवाहाला जाणे गुन्हा नाही असा दावा त्यांचे वकील विकार राजगुरु यांनी केला आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -