घरताज्या घडामोडीशिवसेनेची संकल्पना अजित पवारांनी पळवली

शिवसेनेची संकल्पना अजित पवारांनी पळवली

Subscribe

लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय बनवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात ही संकल्पना शिवसेनेची आहे. शिवसेनेने ही संकल्पना मुंबईत राबवण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात सन २००८-०९मध्येही स्थायी समितीच्या अधिकारात विशेष तरतूदही केली होती. तब्बल तीन वर्षे ही तरतूद करण्यात येत होती, परंतु पुढे सत्ताधारी शिवसेनेला आणि पर्यायाने महापालिकेला याचा विसर पडला. त्यामुळे शिवसेनेची आणि मुंबई महापालिकेची संकल्पना चक्क पळवून राज्याच्या माध्यमातून राबवण्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

मुंबई हे जगभरातील पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे पर्यटनदृष्टया मुंबईचे महत्व वैश्विक पातळीवर आणखी वाढावे यसाठी मुंबई समुद्रात ‘मुंबई आय’ असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी दिली. परंतु लंडनच्या धर्तीवर ‘मुंबई आय’उभारण्याची सर्वात पहिली संकल्पना मुंबई महापालिकेचे तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी मांडली होती. शिवसेनेची संकल्पना म्हणून वायकर यांनी मुंबई आयची उभारणी वांद्य्रातील बँड स्टँड येथे करण्याचा निर्णय घेत त्यासाठी स्थायी समितीच्या अधिकारात अर्थसंकल्प मंजूर करताना एक लाख रुपयांची तरतूद सन २००८-०९मध्ये केली होती. त्यानंतर पुढील वर्षी ‘मुंबई आय’साठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली.पुढे ही तरतूद कायमही ठेवण्यात आली होती. परंतु वायकर आमदार झाल्यानंतर, या संकल्पनेचा विसर खुद्द महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांनाच झाला आणि पुढे ही संकल्पनाच कायमची बाद ठरली.

- Advertisement -

मात्र, राज्यात शिवसेना, राष्ट्वादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लंडनच्या धर्तीवर मुंबईचे विहंगदृश्य पाहता यावे यासाठी मुंबई आयची घोषणा केली. विशेष म्हणजे शिवसेनेने ही संकल्पना मांडताना वांद्य्रात मुंबई आय उभारण्याचा निर्णय विचार केला होता, आणि आता अजित पवार यांनीही वांद्य्रातच ही संकल्प रावबण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे सरकारमध्ये राहून शिवसेनेच्याच संकल्पना पळवत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न राष्ट्वादी काँग्रेसकडून सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेला जे महापालिकेच्या माध्यमातून करता आले नाही ते आता राष्ट्वादी काँग्रेस सरकारच्या माध्यमातून करून दाखवणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -