लाच घेताना सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना ACBकडून अटक

DCP sujata patil arrested by acb
लाच घेताना सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना ACBकडून अटक

मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता पाटील यांच्यावर मोठी कारवाई केली असून एसीबीकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांची लाच घेताना सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडले आहे.

माहितीनुसार सध्या सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा चार्ज आहे. काही दिवसांपूर्वी सुजाता यांनी एका प्रकरणासाठी एक लाखाची मागणी केली होती. याचा पहिला हफ्ता ४० हजार रुपये घेताना सुजाता पाटील यांना रंगेहात एसीबीकडून अटक केली आहे. अजूनही याचा तपास सुरू असून याबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही आहे.

याआधी सुजाता पाटील यांच्याकडे हिंगोलीच्या पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी होती. तसेच सुजाता पाटील यांनी हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहून आत्महत्या आणि राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत व्यक्त केली होती.