Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम अभिनेता आदित्य सिंग राजपूतचा मृत्यू; अंमली पदार्थांचा ओव्हरडोज?

अभिनेता आदित्य सिंग राजपूतचा मृत्यू; अंमली पदार्थांचा ओव्हरडोज?

Subscribe

मुंबई : आदित्य सिंग राजपूत (Aditya Singh Rajput) आज (22 मे) दुपारी त्याच्या घराच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आला. आदित्यच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

आदित्य सिंग राजपूत मुंबईतील एक लोकप्रिय अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग कोऑर्डिनेटर होता. तो त्याच्या अंधेरीतील 11व्या मजल्यावरील उंच इमारतीच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळला. त्याच्या मित्राला तो मृतावस्थेत दिसून आल्यानंतर त्याने इमारतीच्या चौकीदाराला सोबत घेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी आदित्य सिंगचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मृत्यूचे कारण ड्रग्जचे अतिसेवन असल्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, पुढील तपासाशिवाय ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणार असे त्यांनी सांगितले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच आदित्य सिंगच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

- Advertisement -

आदित्य सिंग राजपूत बॉलिवूड कारकिर्द
आदित्य सिंग राजपूतने बॉलिवूडमध्ये मॉडेल आणि अभिनेता म्हणून सुरुवात केली. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली. तो बॉलिवूड इंडस्ट्रीशी चांगला जोडला गेला होता. त्याने अनेक अभिनेत्यांसोबत अनेक ब्रँडसाठी जाहिरात केल्या आहेत. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

आदित्य सिंग राजपूतविषयी थोडक्यात
आदित्य सिंग हा दिल्लीचा असला तरी तो मूळचा उत्तराखंडचा राहणारा आहे. वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरची सुरूवात केली. त्याने 17  त्याने मॉडेल म्हणून सुरुवात करताना ‘क्रांतिवीर’ आणि ‘मैने गांधी को नहीं मारा’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने तब्बल 300 जाहिरातींमध्ये काम केले असून स्प्लिट्सविला 9 सारख्या मालिकेमध्ये भाग घेतला होता. लव्ह, आशिकी, कोड रेड, आवाज सीझन 9, बॅड बॉय सीझन 4 सारख्या इतर टीव्ही प्रोजेक्ट त्याने काम केले आहे. अलीकडे, तो एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये जोडला गेला होता आणि कास्टिंगचे काम सांभाळत होता. तो मुंबई ग्लॅमर सर्किटमध्ये लोकप्रिय असल्यामुळे सेलिब्रिटीच्या पार्ट्या आणि पेज 3 इव्हेंटमध्ये नियमित दिसत होता. आदित्यच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय एक मोठी बहिण आहे. लग्नानंतर ती अमेरिकेत राहत आहे.

- Advertisment -