घरमुंबईसुट्टीसाठी मुंबईत आलेल्या कुटुंबाने दोन्ही मुलं गमावली

सुट्टीसाठी मुंबईत आलेल्या कुटुंबाने दोन्ही मुलं गमावली

Subscribe

सुट्टीसाठी मुंबईत आलेल्या इद्रीसी या कुटुंबाने आपली दोन मुलं डोंगरी परिसरात कोसळलेल्या इमारतीत गमावली आहेत.

मंगळवारी सकाळी ११.५० सुरू झालेलं शोधकार्य हे दुसऱ्या दिवशीही सुरू होतं. बुधवारी सकाळी ५ वाजता जवांनाना ३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं. पण, त्यापैकी दोघांचा हॉस्पिटलमध्ये नेतानाच मृत्यू झाला आणि एक महिला वाचली. या घटनेने इद्रीसी कुटुंबाची खूप मोठी हानी झाली आहे. इद्रीसी कुटुंबातील दोन्ही छोट्या मुलांचा या घटनेत जीव गेला आहे. त्यामुळे, या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


हेही वाचा – Viral Check: डोंगरी इमारत दुर्घटनेचा व्हायरल होणारा तो व्हिडिओ फेक

- Advertisement -

३५ वर्षीय हलिमाबानो मोहम्मद राशीद इद्रीसी या आणि त्यांची दोन मुलं दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गोंडा या गावातून सुट्टीनिमित्त मुंबईत आले होते. पण, मंगळवारी घडलेल्या घटनेत हलिमाबानो आणि दोन्ही मुलं अडकली. या घटनेत हलिमाबानो आणि राशीद यांच्या अरबाज आणि शेहजाद या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, या तिघांनाही बुधवारी सकाळी रेस्क्यू करुन जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हलिमाबानो यांच्या डोक्याला, पायाला आणि हाताला जबर मार बसला आहे.

हमिलाला सकाळी ५ वाजता रेस्क्यू केलं आणि त्यानंतर त्यांना जे.जे मध्ये आणलं. त्यांच्या हाताला जबर मार बसला आहे. तर रक्तपुरवठा देखील होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहेराशीद इद्रीसी , हमिलाबानो यांचे पती

- Advertisement -

या इमारतीत पहिल्या मजल्यावर आम्ही राहत होतो. रात्री बचावमोहीम सुरु असताना ‘मला वाचवा’असा ढिगाऱ्यातून आवाज आला आणि त्या हमीलाबानो अडकल्या असल्याचं समजलं. दोन्ही छोट्या पुतण्यांना आम्ही गमावलं आहेमोहब्बत साबिर, हमिलाबानो हीचे दिर

हमिलाबानो यांचे पती राशीद घरातून कामानिमित्त बाहेर पडले होते. तर राशीदला कारखान्यातून कॉल आला म्हणून ते १०.३० वाजला निघाले होते. राशीद हे कपडे शिलाईचं काम करतात.


हेही वाचा – डोंगरी दुर्घटना : किंकाळ्या, आक्रोश, चिंता आणि मदत!


 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -