Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई रस्ते अपघातात पादचारी मृत्यू वाढले

रस्ते अपघातात पादचारी मृत्यू वाढले

Related Story

- Advertisement -

मुंबईतील बहुतांश ठिकाणांकडील फुटपाथ हे फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. तसेच काही ठिकाणांकडील पदपथ हे मेट्रोच्या कामात गेले आहेत. यामुळे पादचार्‍यांना चालण्यासाठी फुटपाथ उपलब्ध नाही. नाईलाजास्तव पादचार्‍यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्याच कारणामुळे मुंबईतील रस्त्यांवर अपघातामुळे मृत होणार्‍यांच्या संख्येपेक्षा अशा अपघातात पादचार्‍यांच्या होणार्‍या मृत्यूंची संख्या अधिक झाली आहे, असा अहवाल निष्कर्ष ‘ब्लूमबर्ग फिलनथोर्फी इन्सेटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात निघाला आहे.

ग्लोबल रोड सेफ्टी आणि मुंबई वाहतूक नियंत्रण शाखा यांचा मुंबई रस्ते सुरक्षा अभियान वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात मुंबईतील रस्त्यावर होणार्‍या अपघात मृत्यू होणार्‍यांची संख्येची मागील पाच वर्षांपासूनची आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू होणार्‍यांची सर्वाधिक संख्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील असून वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेमुळे मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे अपघाताची संख्याही कमी झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

पश्चिम द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले असून त्यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. २०१८ मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अपघातात ५२ जणांचा मृत्यू झाला असून पूर्व द्रुतगती महामार्गावर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वामी विवेकानंद रोड (एसव्ही रोड) या ठिकाणी १६ जणांचा मृत्यू झाला असून सायन ट्रॉम्बे रोडवर ९ जणांचा अपघात मृत्यू झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथे ८ जणांचा मृत्यू झाला असून लिंक रोड येथे ७ जण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.

अहवालानुसार मुंबईत २०१५ मध्ये अपघातात मृत झालेल्यांच्या तुलनेत २०१८ मध्ये मृतांची संख्या २२ टक्क्यांनी घटली आहे. २०१५ मध्ये रस्ते अपघातात ६११ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये हि संख्या ४७५ वर आली आहे. तसेच २०१५ मध्ये जखमींची संख्या ४,०२९ इतकी होती, तर २०१८ मध्ये ही संख्या ३,२९२ झाली आहे. तर २०१५च्या तुलनेत २०१८मध्ये अपघातात पादचार्‍यांच्या मृत्यूचे प्रमाण ५१ टक्केे झाले आहे.

- Advertisement -