घरCORONA UPDATELockDown : कर्जात बुडालेल्या टीव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

LockDown : कर्जात बुडालेल्या टीव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Subscribe

आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीत ग्रेवाल याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली.

लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसेच डोक्यावर कर्ज असल्याने टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल तणावात होता. त्यामुळे मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घरातच गळफास घेत त्याने आपले आयुष्य संपवले. मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लोकांमुळे गेल्या दोन महिन्यापासून त्यांच्या हाताला काम नव्हते. यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ते पुढील तपास करीत आहेत.

घराचे भाडे देण्यासाठीही नव्हते पैसे

आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना त्यात लॉकडाऊनची भर पडल्याने मनमीत खूप त्रस्त होता. आर्थिक अडचणींमुळे आधीच अनेक समस्या असताना लॉकडाऊनमुळे त्याच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. छोटे-मोठे काम मिळत नसल्याने त्याचा तणाव वाढला होता. यामुळे अखेर त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की, घराचे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते. याच तणावाने अखेर त्याचा जीव घेतला.

- Advertisement -

वेब सीरिजमध्ये केले काम

मनमीनतने काही मालिकांव्यतिरिक्त जाहिरातींमध्येही काम केले होते. तसेच आठ एपिसोड असणाऱ्या एका वेब सीरिजमध्येही काम करत होता. यामधील तीन एपिसोडमध्ये तो दिसणार होता. याशिवाय अनेक अँक्टिंग स्कूलमध्ये तो शिकवण्यासाठी जात होता. पण लॉकडाऊनमुळे हे सगळेच बंद पडले होते. मनमीतने सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ तसंच अ‍ॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत काम केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -