घरमुंबईइंजिनिअरिंगचे विद्यार्थी सूचवणार नागरी समस्यांवर तांत्रिक उपाय

इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सूचवणार नागरी समस्यांवर तांत्रिक उपाय

Subscribe

स्वच्छता, पर्यावरण विषयावर संशोधन

एरवी अभ्यासात गढून गेलेले मुंबईतील विविध इंजिनिअरिंग कॉलेजांतील विद्यार्थी गेल्या काही आठवड्यांपासून प्रत्यक्ष नागरी समस्यांवर आधारित प्रकल्पांवर काम करत आहेत. कुणी सार्वजनिक शौचालयांत स्वच्छता राखण्यासाठी तंत्रज्ञान आधारित उपाययोजना शोधत आहे, कुणी रस्त्यांची डागडुजी करण्यासाठीची संगणक प्रणाली (software) विकसित करत आहे, तर कुणी देशात सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारी कंपनी शोधण्यासाठी झटत आहे. निमित्त आहे, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘प्रोजेक्ट डीप ब्ल्यू’ या स्पर्धेचे.

इंजिनिअरिंग किंवा तंत्रशिक्षण घेत असतानाच आपल्या आसपासच्या नागरी समस्यांविषयीची जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये वाढावी, आणि या नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करावा, यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने मॅस्टेक व मॅजेस्को या दोन बहुराष्ट्रीय कंपन्या ‘प्रोजेक्ट डीप ब्ल्यू’ ही स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील नावीन्यपूर्ण कल्पना व संशोधनाला चालना दिली जाते. राष्ट्रीय पातळीवरील एखाद्या विषयावरील समस्येवर तंत्रज्ञान आधारित उपाययोजना सूचवण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, हा या स्पर्धेमागचा हेतू असतो. समस्या-विषय निवडून त्यावर तांत्रिक उपाययोजना सूचवण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिने मिळतात.
सायनच्या के.जे. सोमय्या इंजिनिअरिंग कॉलेजातील उत्कर्ष सिंग, प्रथमेश पानसे, ओमकार पाटील, कपिल तरे हे इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाचे विद्यार्थी शहरी झोपडपट्ट्यांमधील उपलब्ध सार्वजनिक शौचालयांची निगा व स्वच्छता कशी राखता येईल आणि त्यांची स्थिती ट्रॅक करण्यासाठी तंत्रज्ञान आधारित उपाययोजना कशी विकसित करता येईल, या प्रकल्पावर काम करत आहेत.

- Advertisement -

डी.जे. संघवी इंजिनिअरिंग कॉलेजच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी जुही शाह, राहिल सर्वय्या, शामिल शाह हे ‘प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीतील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर काम करत आहेत. याविषयी माहिती देताना शामिल शाह म्हणाला, आपल्या घराजवळच्या कचरा पेटीत कचरा जमा होतो. नागरिकांनी फक्त कचर्‍याचा फोटो काढायचा आणि आम्ही बनवत असलेल्या संगणकप्रणालीमध्ये अपलोड करायचा. फक्त या फोटोद्वारे तो प्लास्टिक कचरा रॅपर, बॅग, पाकीट, बाटली नेमके काय आहे हे अलगोरिदम निश्चित करेल. इतकेच नव्हे तर ते प्रोडक्ट कोणत्या ब्रॅण्डचे आहे, हेसुद्धा ओळखेल आणि त्याच्या उत्पादकाला बॅकट्रॅक करेल. या माहितीच्या आधारे आपण एक आलेख बनवू शकू, ज्याद्वारे आपल्या देशात सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारे उत्पादक आपण ओळखू शकू.

डीप ब्ल्यू प्रोजेक्टसाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागवल्या जातात. निवडलेल्या प्रकल्पांत स्पर्धा होऊन विजेत्यांना त्यांचा प्रकल्प पुढे नेण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर तो व्यवहार्य ठरावा यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, असे डीप ब्ल्यू प्रोजेक्टच्या समन्वयिका कविता मुखर्जी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -