घरमुंबईफडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा मान ठेवला म्हणून... केसरकारांचा गौप्य स्फोट

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा मान ठेवला म्हणून… केसरकारांचा गौप्य स्फोट

Subscribe

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर(deepak kesarkar) यांनी सुद्धा एक मोठं विधान करत गौप्य स्फोट केला आहे. राजकीय वर्तुळात सध्या त्याचीच चर्चा रंगत आहे.

राज्यात शिंदे – फडणवीसांचं9shidne fadanvis) सरकार सत्तेत आल्यांनतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुंबई महानगर मालिकेच्या निवडणूक आगामी काळात होणार आहेत. याच निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन प्रत्येक पक्ष पुन्हा एकदा नव्याने पक्षबांधणी करत आहे अशातच भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आता मोठया प्रमाणावर ऍक्टिव्ह झाले आहेत. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर(deepak kesarkar) यांनी सुद्धा एक मोठं विधान करत गौप्य स्फोट केला आहे. राजकीय वर्तुळात सध्या त्याचीच चर्चा रंगत आहे.

हे ही वाचा – फडणवीस जिथे उभे राहतात ‘लाइन वही सें शुरू होती हैं’ सांगत आशीष शेलार म्हणाले…

- Advertisement -

दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे(uddhav thackeray) आणि आदित्य ठाकरे(aditya thackeray) यांच्यावर टीका करत म्हणाले, ”2017 सालीच मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा मन ठेऊन काही केले नाही” असा गौप्य स्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे राजकीय वर्तुळातूनही नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर दीपक केसरकर म्हणले, ”भाजप आणि शिंदे गट मुंबई महापालिकेत(bmc election) युती करणार आहेत. दोन्ही एकत्र येऊन 150 पेक्षा अधिक जागा निवडून आणू. असा दावा करत आमची युती आता कायम राहणार आहे, आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही” असंही दीपक केसरकर म्हणले.

- Advertisement -

हे ही वाचा – आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही बसू देणार नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंना टोला

दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकरांनी(deepak kesarkar) अनेक मुद्दे उपस्थित केले. ठाकरे गटाला आव्हान देत शिंदे गटाने फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, शिंदे गटात गेलेले सर्व आमदार गद्दार असल्याची मोहीम ठाकरे गटाने चालवली. त्यामुळे संतापलेल्या शिंदे गटातील प्रवक्ते आता उद्यापासून ठाकरेविरोधी मोहीम राबवणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेचा कसा विश्वासघात केला हे उद्यापासून आमचा प्रवक्ता सांगणार आहे. त्याचा संपूर्ण घटनाक्रम उदय सामंत उद्या सांगतील.’ आज पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकरांनी ही माहिती दिली.

हे ही वाचा –  मनसेची रणनीती ठरणार? राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, कार्यकर्त्यांसाठी मेळावाही घेणार

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -