माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात

डॉ. सावंत यांच्या मानेला व पाठिला दुखापत झाली आहे. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी डॉ. सावंत यांना उपचारासाठी मुंबईला पाठवले आहे. डंपरच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे.

मुंबईः माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला काशिमीरा येथे अपघात झाला आहे. डॉ. सावंत हे अपघातात जखमी झाले आहेत. कारचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर येथील आश्रमशाळेत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी डॉ. सावंत हे शुक्रवारी सकाळी पालघरला जात होते. त्यांची कार काशिमीरा येथे आली तेव्हा मागून एका डंपरने कारला धडक दिली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. डॉ. सावंत यांच्या मानेला व पाठिला दुखापत झाली आहे. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अहमदाबाद महामार्गावर काशिमिरा परिसरातील सगणाई माता मंदिर चौक येथे हा अपघात झाला आहे. डंपर चालकाला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सावंत हे स्वतःच रुग्णवाहिकेने मुंबई येथील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. या घटनेतील दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अशी काशीमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.