अमृता फडणवीसांना दिपाली सय्यद यांचा ट्विटर टोला

Deepali Syed's reply to Amrita Fadnavis's tweet
Deepali Syed's reply to Amrita Fadnavis's tweet

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर आता एका अभिनेत्रीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आक्षेपार्ह शब्दात टिका केली आहे. या अभिनेत्रीचे नाव दिपाली सय्यद असून त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणारे एक ट्वीट केले होते. त्याला दिपाली सय्यद यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. वजनदारने पुरणपोळी खाके हल्केसे वेगळा विदर्भ मांग्या I दुसरो को हल्का करने के चक्कर मे मामी का युसुफ लकडावाल से ढोंग्या I जिसको हल्के मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या I, असे ट्विट दिपाली संय्यद यांनी केले आहे.

आमृता फडणवीस यांनी बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया … असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते.तर देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना त्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे तो बघा. आज माझं वजन 102 किलो आहे, ज्यावेळी मी बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल. पण लक्षात ठेवा हा देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता.