विरारमध्ये घरात डांबून ठेवलेल्या हरणाची सुटका

वनविभागाकडून दोघांना अटक

वन विभाग आदिवासींच्या जीवनात विविध अडचणी आणून त्यांना जगणे नकोसे करीत असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने वाडा तहसील कार्यालय व वन विभाग कार्यालयासमोर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

विरारमध्ये एका घरात गेल्या चार महिन्यांपासून पिंजर्‍यात डांबून ठेवलेल्या हरणाची सुटका मांडवी वनविभागाने केली आहे. याप्रकरणी रुतेश पाटील आणि प्रथमेश ओघे यांना मांडवी वनविभागाने अटक केली आहे. विरार पूर्वेकडील कोपरी गावात हरी ओम नावाच्या बंगल्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या हरणाच्या पिल्लाला डांबून ठेवण्यात आले होते. याबाबतची गुप्त माहिती मांडवी वनविभागाच्या अधिकारी नम्रता पवार यांना मिळताच त्यांनी बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास बंगल्यात धाड टाकली. यावेळी बंगल्यातील तिसर्‍या माळ्यावर एका पिंजर्‍यामध्ये या हरणाला डांबून ठेवण्यात आले होते. वनविभागाच्या पथकाने हरणाची ताबडतोब सुटका करून मांडवी येथे नेले.

धक्कादायक बाब म्हणजे या हरणाची शिंगे कापण्यात आलेली आहेत. बारशिंग जातीचे हे हरिण असून त्याला बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्याप्रकरणी वनविभागाने रुतेश पाटील आणि प्रथमेश ओघे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पाटील या वसईतील एका बड्या नेत्याचा भाचा असल्याचीही माहिती समोर आली आहे.