राजनाथ सिंह यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस

defence minister rajnath singh shastra pooja darjeeling dussehra sukna war memorial

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईच्या डॉकयार्ड मध्ये आयएनएस विशाखापट्ण्णमच्या समारोह कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांना फोन केला आणि उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची चौकशी केली.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे मानदुखी व पाठदुखीने त्रस्त होते. त्यानंतर त्रास बळावल्याने त्यांना १० नोव्हेंबरला एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. १२ नोव्हेंबरला त्यांच्यावर य़शस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे.