Homeक्राइमCyber Crime : क्रेडिट कार्डच्या बहाण्याने पोलीस अधिकार्‍याची फसवणूक; अज्ञात सायबर ठगाविरुद्ध...

Cyber Crime : क्रेडिट कार्डच्या बहाण्याने पोलीस अधिकार्‍याची फसवणूक; अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

क्रेडिट कार्डच्या बहाण्याने एका पोलीस अधिकार्‍याची अज्ञात सायबर ठगाने सुमारे चार लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात घडला.

मुंबई : क्रेडिट कार्डच्या बहाण्याने एका पोलीस अधिकार्‍याची अज्ञात सायबर ठगाने सुमारे चार लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात घडला. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध वनराई पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (defrauding a police officer under the guise of a credit card a fraud case has been registered against an unknown cyber thug)

या प्रकरणातील तक्रारदार गोरेगाव येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते एसआरपीएफमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात. 21 डिसेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन एका व्यक्तीने कॉल केला. त्यांना क्रेडिट कार्डची ऑफर देत त्याने बँकेची एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करून त्यांनी त्यांच्या माहितीसह ओटीपी क्रमांक शेअर केला.

हेही वाचा – Personal Secretary : मंत्र्यांच्या खासगी सचिवपदासाठी जोरदार लॉबिंग; मुख्यमंत्री कार्यालयाकडे इच्छुकांच्या नजरा

ही माहिती अपलोड होताच काही वेळात त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले. या व्यवहारातून चार लाख आठ हजार रुपयांचे डेबिट झाले होते. बँकेतून पैसे गेल्याचा मेसेज येताच त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर हेल्पलाईनसह वनराई पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगांचा शोध सुरू केला आहे. सायबर सेलचे अधिकारीही या गुन्ह्याचा समांतर तपास करत आहेत.

हेही वाचा – Drugs Trafficking : ड्रग्ज घेऊन पाकिस्तानी नागरिक भारतात; दहा वर्षांनी मिळाली 20 वर्षांची शिक्षा


Edited by : Ashwini A. Bhatavdekar